महिन्याभरात ब्रिटनहून आलेल्या नागरिकांनी चाचणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:45+5:302020-12-24T04:07:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन प्रकार तिथे वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन प्रकार तिथे वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्याच्या कालावधीत ब्रिटनहून मुंबईत आलेल्या नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ पालिकेच्या संबंधित वॉर्ड वॉररूमशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार यांच्याद्वारे मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवीन प्रकारच्या विषाणूचा प्रसार मुंबईत होऊ नये, यासाठी महापालिकेनेही कडक उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार, २५ नोव्हेंबर, २०२० पासून म्हणजे एक महिना कालावधीमध्ये ब्रिटनमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
* फॅमिली डॉक्टर/नजीकच्या पालिका दवाखाना, आरोग्य केंद्र येथे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
* ब्रिटनवरून आलेल्या नागरिकांनी कोविड चाचणी करून घ्यावी, तसेच मास्कचा वापर, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा.
* ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा अन्य आजारांचेही कोणतेही लक्षण असल्यास घाबरून जाऊ नये. पालिकेच्या ‘वॉर्ड वॉररूम’कडे संपर्क साधावा.
‘वॉररूम’चे दूरध्वनी संपर्क क्रमांक
ए ०२२-२२७००००७, बी ०२२-२३७५९०२३, सी ०२२-२२१९७३३१, डी ०२२-२३८३५००४, ई ०२२-२३७९७९०१, एफ/दक्षिण ०२२-२४१७७५०७, एफ/उत्तर ०२२-२४०११३८०, जी/दक्षिण ०२२-२४२१९५१५, जी/उत्तर ०२२-२४२१०४४१, एच/पूर्व ०२२-२६६३५४००, एच/पश्चिम ०२२-२६४४०१२१, के/पूर्व ०२२-२६८४७०००, के/पश्चिम ०२२-२६२०८३८८, पी/दक्षिण ०२२-२८७८०००८, पी/उत्तर ०२२-२८४४०००१, आर/दक्षिण ०२२-२८०५४७८८, आर/उत्तर ०२२-२८९४७३५०, आर/मध्य ०२२-२८९४७३६०, एल ०२२-२६५०९९०१, एम/पूर्व ०२२-२५५२६३०१, एम/पश्चिम ०२२-२५२८४०००, एन ०२२-२१०१०२०१, एस ०२२-२५९५४०००, टी ०२२-२५६९४०००