नगरपरिषदेचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ मॅनेजमेंट

By admin | Published: May 25, 2014 02:17 AM2014-05-25T02:17:29+5:302014-05-25T02:17:29+5:30

आपत्ती नियंत्रणात संपर्क आणि संवाद हा अत्यंत महत्वाचा असतो, आणि त्याकरिता जनसामान्यांना सोईचे, सहज उपलब्ध आणि माहिती देणारे माध्यम वापरणे नितांत गरजेचे असते

City Council's 'What's App' Management | नगरपरिषदेचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ मॅनेजमेंट

नगरपरिषदेचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ मॅनेजमेंट

Next

जयंत धुळप, अलिबाग - आपत्ती नियंत्रणात संपर्क आणि संवाद हा अत्यंत महत्वाचा असतो, आणि त्याकरिता जनसामान्यांना सोईचे, सहज उपलब्ध आणि माहिती देणारे माध्यम वापरणे नितांत गरजेचे असते. अलिबाग नगरपालिका क्षेत्रांतील १७ प्रभागातील वीस हजार नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांनाही नगरपरिषदेशी संपर्क साधणे शक्य व्हावे या करिता व्हॉटस अ‍ॅपचा वापर करण्याचे ठरविले आहे. यंदा प्रथमच अलिबाग नगरपरिषद अशा यंत्रणेची मदत मान्सून काळात घेणार असल्याची माहिती अलिबागच्या नगराध्यक्षा अ‍ॅड.नमिता नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. अलिबागमध्ये १७ प्रभाग असून त्या प्रभागात प्रत्येकी एक नगरसेवक आहे. हा नगरसेवक आपापल्या प्रभागातील व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करणार्‍या ५० नागरिकांचे मोबाईल नंबर्स आपल्या मोबाईलमध्ये नोंद करुन घेऊन, त्यांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करेल. असे एकूण किमान ८५० नागरिक १७ ग्रुपच्या माध्यमातून अलिबाग नगरपरिषदेशी जोडले जातील. या ८५० नागरिकांशी त्यांच्या व्यक्तिगत संपर्कातून प्रत्येकी किमान २५ या प्रमाणे किमान २१ हजार २५० व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे नागरिक जोडलेले असणार असे गृहीत धरण्यात आले आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून अलिबागकर नागरिकांना कोणतीही सूचना,अ‍ॅलर्ट, संदेश द्यायचा असेल तेव्हा तो शहरातील १७ नगरसेवकांना व्हॉट्स अ‍ॅपवर पाठविण्यात येईल. तोच संदेश काही क्षणात ते नगरसेवक आपापल्या ग्रुपमधील एकूण ८५० नागरिकांना तत्काळ पाठवतील.

Web Title: City Council's 'What's App' Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.