शहरात घरफोड्यांचे सत्र जोरात

By admin | Published: May 24, 2014 12:18 AM2014-05-24T00:18:17+5:302014-05-24T00:18:17+5:30

शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकाजवळील दोन इलेक्ट्रॉनिक्स व मोबाइल शॉपचे शटर तोडून गुरूवार रात्री चोरांनी लाखोंचा माल व रोकड घेऊन पोबारा केला.

In the city, the house-to-house session is loud | शहरात घरफोड्यांचे सत्र जोरात

शहरात घरफोड्यांचे सत्र जोरात

Next

जव्हार : शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकाजवळील दोन इलेक्ट्रॉनिक्स व मोबाइल शॉपचे शटर तोडून गुरूवार रात्री चोरांनी लाखोंचा माल व रोकड घेऊन पोबारा केला. जव्हारमध्ये रात्री ३.०० ते ४.०० च्या सुमारास भुरट्या चोरांनी मुख्यबाजारपेठेत असलेले अजमेरी इलेक्ट्रॉनिक्स अय्याज मेमन व एजाज कोतवाल यांच्या दुकानांचे शटर जॅकच्या सहाय्याने फोडून आत प्रवेश केला. दुकानात मोबाइल, होम थिएटर, मेमरीकार्डसारख्या महागड्या वस्तू घेऊन जवळजवळ ३.५० लाखाचा माल व रोकड घेऊन पळाले. १५ दिवसांपूर्वी जाकीर शेख यांच्या एस. टी. स्टॅन्ड येथील टपरीचे शटर तोडून मोबाइल व रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश मिळाला होता. परंतु पोलीस खात्याकडून अद्याप या भुरट्या चोरांना पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांत व व्यापार्‍यांत घबराट निर्माण होऊन तीव्र नाराजी पसरली आहे. चोरांनी गाडीच्या जॅकने शटरच्या मध्यभागी उचकून दुकानात शिरुन हातात सापडेल तितके सामान पळवले.

Web Title: In the city, the house-to-house session is loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.