शहरातील वाहतूककोंडी सुटू शकते

By admin | Published: April 17, 2017 03:55 AM2017-04-17T03:55:28+5:302017-04-17T03:55:28+5:30

वाहतूककोंडीच्या समस्येने सध्या दादरकर त्रस्त आहेत. दादरमधील जेमतेम अर्धा किमी अंतरातल्या अनेक लहान-मोठ्या रस्त्यांवर सतत

City transporters can escape | शहरातील वाहतूककोंडी सुटू शकते

शहरातील वाहतूककोंडी सुटू शकते

Next

अक्षय चोरगे, मुंबई
वाहतूककोंडीच्या समस्येने सध्या दादरकर त्रस्त आहेत. दादरमधील जेमतेम अर्धा किमी अंतरातल्या अनेक लहान-मोठ्या रस्त्यांवर सतत वाहतूककोंडी असते, त्यामध्ये प्रामुख्याने सेनापती बापट मार्ग, लेडी जमशेदजी मार्ग, वीर सावरकर मार्ग आणि यांना समांतर असलेले जे. के. सावंत मार्ग, मोगल लेन, दिलीप गुप्ते मार्ग यावरसुद्धा सतत वाहतूककोंडी असते. यावर उपाय म्हणून दादरमधील स्थानिक रोहित कत्रे यांनी दादरमधील वाहतूककोंडीवर उपाय शोधला असून, याद्वारे येथील वाहतूककोंडी सुटू शकते, असा दावा कत्रे यांनी केला आहे.
दादरमध्ये सर्वात जास्त वाहतूककोंडी ही दादर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या टिळक पुलावर असते. दिवसभरात १६ ते १८ तास या पुलावर वाहतूककोंडी असते. कत्रे यांनी दादरमधील वाहतूककोंडीवरील उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. २ं५ींिंि१.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर तो आराखडा पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आराखड्यानुसार टिळक पुलाला समांतर असा ‘न्यू टिळक ब्रिज’ बांधायचा, जो शिवसेना भवनासमोरील थोटे मिल्क सेंटरजवळून सुरू होईल आणि पद्माबाई ठक्कर मार्ग-बाळ गोविंद दास मार्गावरून लेडी जहांगीर मार्गावजवळ नानालाल मेहता फ्लायओव्हरच्या पायथ्याजवळ संपेल. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की, हा पूल बांधत असताना, कुठेही लोकांचे स्थलांतर करावे लागणार नाही वा इमारती पाडाव्या लागणार नाहीत, असा कत्रे यांचा दावा आहे. ज्या परिसरामधून हा पूल जाईल, तेथे या पूलासाठी पुरेशी जागा आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या टिळक पुलाच्या पुनरुज्जीवनासाठी या पूलाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या नव्या पुलामुळे प्रभादेवी, परळ, दादर पूर्व-पश्चिम, माटुंगा पूर्व-पश्चिम, माहिम, सायनपर्यंतची वाहतूककोंडी सुटेल.
दुसरा उपाय म्हणजे टिळक पुलाचे रुंदीकरण करणे. ब्रिटिशांनी टिळक पूल बांधताना तो अशा प्रकारे बांधला आहे की, आताच्या प्रशासनाने त्याचे रुंदीकरण करण्याचे ठरविले, तर ते अगदी सोपे आहे. ज्या ठिकाणी हा पूल रेल्वे रुळांना पार करतो, त्या ठिकाणी प्रशासनाला काम करावे लागेल. हा एवढा साधा उपाय जर प्रशासनाने केला, तर दादरमधील वाहतूककोंडीचा मार्ग सुटेल.

दादरमध्ये नवीन पूल बांधायला जागा उपलब्ध नाही. शिवाय टिळक पुलाचे रुंदीकरण करणे शक्य नाही. दादर आणि मुंबईमधील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर देणे गरजेचे आहे, शिवाय सायकलचा वापर करणे गरजेचे आहे. महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, कुठेच मोफत पार्किंगला मुभा देण्यात येऊ नये आणि वाहनांची संख्या मर्यादित राहील, याची काळजी घ्यावी.
- अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ
दादरचे महाड न होवो : महाडला जुना पूल कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. तसे दादरमध्ये होऊ द्यायचे नसेल, तर शासनाला त्वरित पावले उचलावी लागतील. टिळक पूल पाडून नव्याने बांधावा लागेल अथवा त्याची दुरूस्ती करावी लागेल
शंभर वर्षे पूर्ण होत आलेल्या टिळक पुलावर नेहमी वाहतूककोंडी असते आणि त्यात भर म्हणून दादरसह इतर भागांमधील तीनमजली इमारतींच्या जागी १५ ते २० मजली टॉवर बांधून लोकसंख्या आणि वाहनसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. २ं५ींिंि१.ङ्म१ॅ चा त्यावर तोडगा प्रस्तावित आहे.
- रोहित कत्रे

Web Title: City transporters can escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.