Join us

पोलीस आयुक्तालयातील ‘सीआययू’ कार्यालयाची आठ तास झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:06 AM

एनआयएकडून वाझेंचा मोबाइल, आयपॅड जप्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्फोटक कारच्या तपासाच्या आनुषंगाने ...

एनआयएकडून वाझेंचा मोबाइल, आयपॅड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्फोटक कारच्या तपासाच्या आनुषंगाने मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागाची झाडाझडती घेतली. सचिन वाझे यांच्या मोबाइल व आयपॅडसह कार्यालयातील त्यांचे साहित्य जप्त केले. त्यातून गुन्ह्यातील त्यांच्या सहभागाचे अनेक पुरावे उपलब्ध हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे चारवाजेपर्यंत जवळपास आठ तास ही कारवाई सुरू होती.

उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ वाझे यांनीच पार्क केल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर व पदाचा दुरुपयोग केल्याबद्दलचे सर्व तांत्रिक पुरावे जमविण्याचे काम एक पथक करीत आहे. त्याआनुषंगाने सोमवारी त्यांच्या घरातून मोबाइल व आयपॅड जप्त केला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पथक आयुक्तालयातील नव्या इमारतीतील चौथ्या मजल्यावरील सीआययूच्या कक्षात पोहोचले. वाझे आणि त्यांचे सहकारी बसत असलेल्या कक्षाची झाडाझडती सुरू केली. तेथील तपासाचे पेपर, संगणक, सीडी ड्राइव्ह व अन्य वस्तूंची तपासणी करून गुन्ह्याच्या आनुषंगाने आवश्यक डाटा जप्त केला. त्याचा पंचनामा करून ते ताब्यात घेतले. पहाटे ४ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

--------------- - ----