मुंबई : महापालिकेने ‘दुकाने व आस्थापना’ खात्याशी संबंधित विविध व्यवहार करण्यासाठी आॅनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून, याची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार आहे. आस्थापना सुरू करायच्या झाल्यास दुकाने व आस्थापना खात्याकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. मनुष्यबळ वाढल्यास किंवा घटल्यास, मालकामध्ये बदल झाल्यास, मालकी हक्काच्या स्वरूपात बदल झाल्यास, आस्थापनेची जागा बदलल्यास किंवा कंपनी असल्यास संचालक मंडळातील बदल याबाबतची माहिती देणे बंधनकारक असते. मात्र आता या सर्व बाबी फक्त ‘कॅशलेस’ पद्धतीने म्हणजेच ‘आॅनलाइन’ पद्धतीने करता येणार आहेत. (प्रतिनिधी)
महापालिकाही ‘कॅशलेस’
By admin | Published: December 23, 2016 5:17 AM