वाहतूककोंडी ठरतेय जीवघेणी

By Admin | Published: January 22, 2017 02:45 AM2017-01-22T02:45:09+5:302017-01-22T02:45:09+5:30

नव्या प्रभाग रचनेमुळे १०५ व १०६ या दोन्ही प्रभागांना भेडसावणारी एकच प्रमुख समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी. मुलुंड पूर्वेस नवघर रोड हा एकमेव मार्ग पूर्व द्रुतगती मार्गास जोडणारा

Civil war | वाहतूककोंडी ठरतेय जीवघेणी

वाहतूककोंडी ठरतेय जीवघेणी

googlenewsNext

मुंबई : नव्या प्रभाग रचनेमुळे १०५ व १०६ या दोन्ही प्रभागांना भेडसावणारी एकच प्रमुख समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी. मुलुंड पूर्वेस नवघर रोड हा एकमेव मार्ग पूर्व द्रुतगती मार्गास जोडणारा आहे. त्यामुळे येथे बाहेरून येण्या-जाण्यासाठी वाहतूककोंडीचा सामना येथील मतदारांना करावा लागतो. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या या दोन्ही प्रभागांच्या प्रचारात केंद्रस्थानी असणार आहे.
वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी केळकर कॉलेजकडून थेट खार जमिनीतून गोरेगाव लिंक रोडला जाणारा ९० फुटी रस्ता गेली २५ वर्षे प्रस्तावित आहे. अनेकदा प्रत्येक उमेदवाराने येथील मतदारांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, परंतु आजही ते कोणत्याही राजकीय पक्षाने पूर्ण केलेले नाही. आता तर खार जमिनीची लिजही संपलेली आहे, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा येथे अभाव दिसून आला आहे. याच प्रभागात वामन मुरांजन शाळेच्या लगत असलेला सरकारी भूखंडावर क्रीडा संकुल आरक्षित आहे. दोन वर्षांपूर्वी येथे झोपडपट्टीचे अतिक्रमण झालेले होते. तो लढा सर्वच पक्षांनी एकत्रित येऊन लढला. मात्र, त्याच गतीने येथे क्रीडा संकुल व्हावे, यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. वास्तविक, या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणे झालेली असूनही, तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशा आविर्भावात सारेच राजकीय पुढारी वावरताना दिसतात. मात्र, या पालिका निवडणुकीत बहुसंख्य सुशिक्षित मतदारांकडून हे कळीचे मुद्दे उपस्थित केले जातील याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)

मतदारांच्या मागण्या
या प्रभागातील रस्त्यावरील दिव्यांचा मुद्दा ऐरणीवर असून, भाजीपाल्यासाठी वेगळी जागा, सार्वजनिक शौचालय, मासळीबाजार, अ‍ॅम्पी थिएटर, कचऱ्याचे नियोजन व दिशादर्शन फलकांची मागणी येथील मतदारांनी केली आहे. त्यामुळे या प्रमुख समस्यांचा इच्छुक महिला उमेदवारांनी अभ्यास करावा आणि नंतर मते मागावीत, असे मतदारांचे म्हणणे आहे.

Web Title: Civil war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.