सीकेपी सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 02:47 AM2020-05-03T02:47:05+5:302020-05-03T02:47:26+5:30

२०१४ मध्ये बँकेच्या तोट्यात वाढ आणि बँकेच्या मुल्यांकनात लक्षणीय घट झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली होती. यानंतर ही बंदी अनेक वेळा वाढविण्यात आली होती

CKP Co-operative Bank's business license revoked; Action of the Reserve Bank | सीकेपी सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

सीकेपी सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

Next

मुंबई : रिझर्व्ह बँकेने अखेर सीकेपी सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना अखेर रद्द केला आहे. एप्रिल २०१४ पासून ठेवी स्वीकारण्याला आणि बँकेच्या नवीन कर्ज वितरणावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते. त्यानंतर आता सीकेपी सहकारी बँकेवरही बंदी घातली आहे.
मध्यमवर्गीर्यांची बँक म्हणून प्रचलित असलेल्या सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाण्यात आठ शाखा आणि सुमारे सव्वा लाख खातेदार आहेत. २०१४ मध्ये बँकेच्या तोट्यात वाढ आणि बँकेच्या मुल्यांकनात लक्षणीय घट झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली होती. यानंतर ही बंदी अनेक वेळा वाढविण्यात आली होती. यावेळी ३१ मार्चच्या शेवटी ती वाढवून ३१ मे पर्यंत केली गेली होती. परंतु बँकेची स्थिती न सुधारल्याने आरबीआयने कडक पावले उचलली आहेत.

बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी पुरेशी संधी व वेळ देऊनही त्याला आलेले अपयश आणि उत्तरोत्तर खालावत चाललेली बँकेची आर्थिक
स्थिती पाहता, बँकिंग नियमन कायद्याच्या कलम २२ व ५६ अन्वये बँक म्हणून व्यवसाय करण्याचा परवाना रद्दबातल करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला.

Web Title: CKP Co-operative Bank's business license revoked; Action of the Reserve Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.