Join us

सीकेपी सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 2:47 AM

२०१४ मध्ये बँकेच्या तोट्यात वाढ आणि बँकेच्या मुल्यांकनात लक्षणीय घट झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली होती. यानंतर ही बंदी अनेक वेळा वाढविण्यात आली होती

मुंबई : रिझर्व्ह बँकेने अखेर सीकेपी सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना अखेर रद्द केला आहे. एप्रिल २०१४ पासून ठेवी स्वीकारण्याला आणि बँकेच्या नवीन कर्ज वितरणावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते. त्यानंतर आता सीकेपी सहकारी बँकेवरही बंदी घातली आहे.मध्यमवर्गीर्यांची बँक म्हणून प्रचलित असलेल्या सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाण्यात आठ शाखा आणि सुमारे सव्वा लाख खातेदार आहेत. २०१४ मध्ये बँकेच्या तोट्यात वाढ आणि बँकेच्या मुल्यांकनात लक्षणीय घट झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली होती. यानंतर ही बंदी अनेक वेळा वाढविण्यात आली होती. यावेळी ३१ मार्चच्या शेवटी ती वाढवून ३१ मे पर्यंत केली गेली होती. परंतु बँकेची स्थिती न सुधारल्याने आरबीआयने कडक पावले उचलली आहेत.

बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी पुरेशी संधी व वेळ देऊनही त्याला आलेले अपयश आणि उत्तरोत्तर खालावत चाललेली बँकेची आर्थिकस्थिती पाहता, बँकिंग नियमन कायद्याच्या कलम २२ व ५६ अन्वये बँक म्हणून व्यवसाय करण्याचा परवाना रद्दबातल करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक