Join us

मुंबईचे 'मेघा' हाल; महापालिका, रेल्वे प्रशासनाचे सगळे दावे फोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 6:08 AM

रात्रभर कोसळलेल्या पावसाने रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ठप्प झालेले मुंबईचे रस्ते आणि कोलमडलेली रेलवे वाहतूक दुपारी हळूहळू पूर्वपदावर

मुंबई:मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ८ कोसळलेल्या ३०० पावसाने मुंबईचे जनजीवन मोठा पाऊस होऊनही वाजेपर्यंत मिलिमीटर ठप्प केले. मुंबईत पाणी तुंबणार नाही, हा मुंबई महापालिका आणि दोन्ही रेल्वे प्रशासनांनी केलेला दावा पावसाच्या मुसळधारेत वाहून गेला आहे.

रात्रभर कोसळलेल्या पावसाने रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ठप्प झालेले मुंबईचे रस्ते आणि कोलमडलेली रेलवे वाहतूक दुपारी हळूहळू पूर्वपदावर आली. दुसरीकडे, मुंबईची वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेचा नियंत्रण कक्ष गाठला

उद्घाटनाआधीच पुलाला जोडणारारस्ता खचला

बदलापूर : वांगणीजवळील उल्हास नदीवरील काराव-पासाने पूल निकृष्ट बांधकामामुळे चर्चेत आला आहे. उल्हास नदीवरील या पुलाला जोडणारा नवीन रस्ता पहिल्याच पावसात खचल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या पुलाचे अद्याप उद्‌घाटनहीं आलेले नाही.

गरज असेल तरच बाहेर पडा : मुख्यमंत्री

राज्यात जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांनी सोमवारी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला. नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

जनजीवन दुपारी पूर्ववत

मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर रविवारी उत्तररात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन बाधित झाले. ते पूर्वपदावर येण्यास दुपारचे १२ वाजले. रेल्वे मार्गावर पाणी तुंबल्याने ठाण्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची ठप्प झालेली वाहतूक दुपारी ३च्या सुमारास पूर्ववत झाली.

वाहतुकीला बसला मोठा फटका

• पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद पडली नव्हती, तर ती पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत होती.• हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही मानखुर्द आणि वडाळ्ळ्यादरम्यान बंद पडली होती.• मुंबईचा विमानतळ एक तास बंद ठेवण्यात आला होता. तर ५० पेक्षा अधिक विमाने रद्द करण्यात आली.• बेस्टचे ४३ मार्ग वळविण्यात आले. तर २३ बस ठिकठिकाणी अडकून पडल्या होत्या.• मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकही बंद पडली होती. 

टॅग्स :मुंबईपाऊसमुंबई लोकलएकनाथ शिंदे