मुंबईतील प्रदुषण कमी केल्याचा "उबरपुल"चा दावा
By admin | Published: June 6, 2017 02:47 PM2017-06-06T14:47:35+5:302017-06-06T15:20:04+5:30
मुंबईतील प्रदुषण कमी केल्याचा "उबरपुल"ने दावा केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6- उबर या ट्रान्सपोर्ट माध्यमातून उबरपुल ही सेवा प्रवाशांना दिली जाते. उबरपुलच्या माध्यमातून आपण एक गाडी इतरांसह शेअर करू शकतो. उबरच्या या उबरपुल सिस्टिमने आता एक दावा केला आहे. या सर्व्हिसच्या माध्यमातून 936 हजार लिटर पेट्रोलची बचत केल्याचा दावा उबरपुल करतं आहे. तसंच यामुळे मुंबईत 2622 मेट्रीक टन कार्बन डायॉक्साइ़ड कमी ऊत्सर्जित झाल्याचं उबरपुलचं म्हणणं आहे.
उबरची कॅब शेअरिंग सेवा सध्या सहा शहरांमध्ये सुरू आहे. मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, पुणे आणि कोलकाता या शहरांमध्ये उबरपुल सेवा दिली जाते. या सहा शहरांचं मिळून एकुण 3.44 दशलक्ष लिटर इंधनाची बचत केल्याचा दावा उबर करतं आहे. तसंच 73.38 दशलक्ष किलोमीटर प्रवास केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे उबरपुलच्या माध्यमातून 8.12 दशलक्ष कार्बन डायॉक्साइड हवेत मिसळण्यापासून थांबविण्यात यश आलं आहे. असं उबरने त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हंटलं आहे.
एक वर्षापूर्वी जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्या साधत उबरपुल ही सेवा लाँच करण्यात आली होती. मुंबईमध्ये प्रवास करताना होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारं प्रदुषण रोखणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवी योजना सुरू केली होती, असं उबरच्या ब्लॉगमध्ये सांगण्यात आलं आहे. एक वर्षाआधी आम्ही सुरू केलेल्या योजनेचा परिणार आता दिसतो आहे. उबरगो पेक्षा उबरपुल 50 टक्के स्वस्त आहे इतकंच नाही तर एकाच कारमध्ये इतर लोकही प्रवास करू शकतात. मुंबईतील लोकांसाठी हा चांगला पर्याय तर आहेत तसंच त्यांच्या खिशाला परवडणारी ही योजना आहे, असं उबरपुलचं म्हणणं आहे.
उबरपुलचा जास्त वापर करण्यात मुंबई शहर अग्रेसर आहे. मुंबईमध्ये उबरने प्रवास करणाऱ्यापैकी 30 टक्के लोक उबरपुलचा पर्याय निवडतात. त्यानंतर हैदराबाद शहराचा नंबर लागतो. सप्टेंबर 2015मध्ये बंगळुरूमधून उबरने सेवा द्यायला सुरूवात केली होती.