टीम लोकमत,
मुंबई- नव्या प्रभाग रचनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. युतीबाबत अद्यापही संभ्रम असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतंत्ररीत्या लढण्याची तयारी दर्शवली आहे. विशेषत: दावेदारांसह उत्सुक उमेदवारांमध्येही आघाडी आणि युतीबाबत नाराजी असल्याने प्रत्येकानेच वेगळी चूल मांडण्याबाबतचे संकेत दिले आहेत. मुंबईच्या उपनगरात अशीच काहीशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘के-ईस्ट’ वॉर्डमध्येही राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू झाली आहे.‘के-ईस्ट’ वॉर्डमध्ये नव्या प्रभाग रचनेनुसार १५ प्रभाग निर्माण झाले आहेत, तर गतवर्षीही या वॉर्डमध्ये पंधराच प्रभाग होते. परिणामी प्रभागांची संख्या कमीअधिक झाली नसली तरी प्रभागांच्या सीमांमध्ये फेरबदल झाले आहेत. या कारणास्तव विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. या वॉर्डात खुल्या गटातील महिलांसाठी पाच प्रभाग आरक्षित आहेत. तीन प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असून, एक प्रभाग इतर मागासवर्गीय (महिला) म्हणून आरक्षित आहे. उर्वरित प्रभाग खुले असल्याने उमेदवारांसह दावेदारांमध्ये चुरस रंगली आहे.>या वॉर्डात खुल्या गटातील महिलांसाठी पाच प्रभाग आरक्षित आहेत. तीन प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असून, एक प्रभाग इतर मागासवर्गीय (महिला) म्हणून आरक्षित आहे. >नागरी प्रश्न प्रलंबित‘के-ईस्ट’ वॉर्डमध्ये मजास, मरोळ, सीप्झ, गुंदवली, एमआयडीसी, जे.बी. नगर, कोलडोंगरी आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या वॉर्डातील अनेक नागरी प्रश्न पूर्णत: सोडवण्यात आलेले नाहीत. परिणामी याच नागरी प्रश्नांचे भांडवल नवे उमेदवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे या वॉर्डात अनंत नर, केसरबेन पटेल, विनी डिसुझा, ज्योती अळवणी असे दिग्गज नगरसेवक आहेत. यांच्या खेळीकडेही विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच इतर वॉर्डप्रमाणे येथेही राजकीय पक्षांकडून दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, निवडणुकीच्या धुमाळीत उत्तरोत्तर यात भरच पडणार आहे.
>प्रभाग क्रमांक ७२एकूण लोकसंख्या ५९०५५अनुसूचित जाती १६६६अनुसूचित जमाती ३५५प्रभागाची व्याप्ती : इस्माईल युसूफ कॉलेज, नटवरनगर, बांद्रेकरवाडी, लक्ष्मीनगरप्रभाग क्रमांक ७३एकूण लोकसंख्या ५४२१०अनुसूचित जाती २५३०अनुसूचित जमाती १८७प्रभागाची व्याप्ती : श्यामनगर, मजास बस डेपो, जोगेश्वरी गुंफा, जनता कॉलनी>प्रभाग क्रमांक ७४एकूण लोकसंख्या ५१२९२अनुसूचित जाती १६६३अनुसूचित जमाती ५०५प्रभागाची व्याप्ती : दुर्गानगर, रूपनगर, गणेशनगर, कमाल अमरोही स्टुडिओप्रभाग क्रमांक ७५एकूण लोकसंख्या ५४३९९अनुसूचित जाती २५७३अनुसूचित जमाती ८३७प्रभागाची व्याप्ती : सेव्हन हिल्स रुग्णालय, मरोळ बस डेपो, कदमवाडी, मरोळ, विजयनगरप्रभाग क्रमांक ७६एकूण लोकसंख्या ५४७०७अनुसूचित जाती ४२३२अनुसूचित जमाती ८६४प्रभागाची व्याप्ती : देवल तलाव, सीप्झ, सुभाषनगर, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली गुंफाप्रभाग क्रमांक ७७एकूण लोकसंख्या ५३०४७अनुसूचित जाती २२७२अनुसूचित जमाती ४२५
प्रभाग क्रमांक ७८एकूण लोकसंख्या ५१४९९अनुसूचित जाती ३४६अनुसूचित जमाती २१३प्रभागाची व्याप्ती : वांद्रे प्लॉट, झुला मैदान, शिवाजीनगरप्रभाग क्रमांक ७९एकूण लोकसंख्या ५६६४२अनुसूचित जाती ९६१अनुसूचित जमाती ५६०प्रभागाची व्याप्ती : शंकरवाडी, होली स्पिरिट रुग्णालय, तोलानी कॉलेजप्रभाग क्रमांक ८०एकूण लोकसंख्या ५६१४८अनुसूचित जाती १४५४अनुसूचित जमाती ४७७प्रभागाची व्याप्ती : एम.व्ही. कॉलेज, पारशी कॉलनी, आझादनगर, बिमानगरप्रभाग क्रमांक ८१एकूण लोकसंख्या ४९३३४अनुसूचित जाती २११३अनुसूचित जमाती ६१९प्रभागाची व्याप्ती : शेर-ए-पंजाब कॉलनी, गुंदवली, एमआयडीसी, मरोळ बस डेपो, हनुमान नगरप्रभाग क्रमांक ८२एकूण लोकसंख्या ५१५३४अनुसूचित जाती ३२१४अनुसूचित जमाती ३८२प्रभागाची व्याप्ती : जे.बी. नगर, अशोकनगर, रामलीला मैदान, साईनगर, ए.ए. कॉलनीप्रभाग क्रमांक ८३एकूण लोकसंख्या ५४४१७अनुसूचित जाती ५०६५अनुसूचित जमाती ४१६प्रभागाची व्याप्ती : आंबेडकरनगर, बामणवाडा, पी अॅण्ड टी कॉलनी, ए.ए. कॉलनी>प्रभाग क्रमांक ८४एकूण लोकसंख्या ५९७५५अनुसूचित जाती ९५२अनुसूचित जमाती ६०६प्रभागाची व्याप्ती : कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाषनगरप्रभाग क्रमांक ८५एकूण लोकसंख्या ६०१२७अनुसूचित जाती २५१४अनुसूचित जमाती ३३२प्रभागाची व्याप्ती : डहाणूकर कॉलेज, शास्त्रीनगर, विलेपार्ले पोलीस स्टेशनप्रभाग क्रमांक ८६एकूण लोकसंख्या ५७७२४अनुसूचित जाती २२०९अनुसूचित जमाती ८३९प्रभागाची व्याप्ती : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार व्हिलेज, चिमटपाडाप्रभागाची व्याप्ती : इन्कम टॅक्स कॉलनी, मेघवाडी, इंदिरानगर, कोकणनगरमहत्त्वाचे म्हणजे या वॉर्डातील अनेक नागरी प्रश्न पूर्णत: सोडवण्यात आलेले नाहीत. परिणामी याच नागरी प्रश्नांचे भांडवल नवे उमेदवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर वॉर्डप्रमाणे येथेही राजकीय पक्षांकडून दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.२०१२ साली के/ईस्ट वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवारप्राप्त मते६६उज्ज्वला मोडक, भाजपा८१५९राजेश हेगडे, काँग्रेस५१५१६७मंजिरी परब, सेना१३२००मीना सलीन, मनसे८८९६६८अनंत नर, सेना१४२६७विलास मेहेतर, मनसे६९९६६९शिवानी परब, सेना११०००नम्रता परब, मनसे६६१७७०भालचंद्र अंबुरे, मनसे५०६७इनायत शेख, काँग्रेस३९८५७१संध्या यादव, सेना९१२३सुषमा देसाई, मनसे८०६४७२सुनीता इलवडेकर, सेना९२३४ज्योती बिर्जे, एनसीपी४५५१७३केसरबेन पटेल, काँग्रेस१०८९१स्नेहलता वारेकर, मनसे३३५२७४प्रमोद सांवत, सेना९८४६सुधीर कावा, काँग्रेस७७८५७५सुषमा राय, काँग्रेस६६१३प्रणाली वेदक, सेना४९६९७६स्मिता सावंत, सेना९२७८जगदीश्वरी अमीन, काँग्रेस ८५३९७७विनी डिसुझा, काँग्र्रेस५९३२रिद्धी धुरी, सेना५७०७७८मनीषा पांचाळ, सेना८३०४सुनीता पारकर, मनसे६२८०७९सुभाष पाटकर, सेना१०२४९वीणा भागवत, मनसे८७२३८०ज्योती अळवणी, अपक्ष८४७७सोनाली भाटवडेकर, मनसे ४६९३