Join us

कल्याणच्या सुभेदारीसाठी युतीत दावेदारी

By admin | Published: November 04, 2015 3:16 AM

गेली काही दिवस सुरू असलेल्या तणातणीनंतर सरकारमध्ये कायम राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली असली, तरी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावर भारतीय जनता पक्षानेही

मुंबई : गेली काही दिवस सुरू असलेल्या तणातणीनंतर सरकारमध्ये कायम राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली असली, तरी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावर भारतीय जनता पक्षानेही दावा सांगितल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी प्रसंगी मनसेसह इतर नगरसेवकांची मोट बांधून कल्याण गडावर तोरण बांधण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत.शिवसेना आमदारांची मंगळवारी दुपारी सेनाभवनात बैठक झाली. सरकारमध्ये राहायचे की, बाहेर पडायचे, कल्याण-डोंबिवलीत भाजपाचा पाठिंबा घ्यायचा की, मनसेचा यावर आमदारांची मते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाणुन घेतली. आम्हाला सन्मान मिळत नाही, मतदारसंघातील कामे होत नाहीत, अशा तक्रारींचा पाढा अनेक आमदारांनी या बैठकीत वाचला. शिवसेनेचे मंत्री आम्हाला सांभाळून घेत नाहीत , असा तक्रारवजा सूरही काही आमदारांनी लावला. संजय गांधी निराधार योजना, आत्मा, आरोग्य समित्यांमध्ये ६०/४० च्या फॉर्म्यूल्यानुसार शिवसेनेला स्थान मिळत नसल्याचे आमदारांचे म्हणणे होते. गुलाबराव पाटील, अर्जून खोतकर, हर्षवर्धन जाधव, सुभाष साबणे, सुनील चौधरी यांनी भाजपाविषयी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, शिवसेनेला सरकारमध्ये सन्मान मिळत नसल्याच्या गंभीर तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्या तक्रारी आणि आमदारांच्या कामांची यादीच मी मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहे. राज्याच्या कल्याणासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्नशील राहील आणि वेळोवेळी कामांचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे केला जाईल. तसेच शिवसेनेच्या मतदार संघांतील कामांचाही पाठपुरावा फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तूरडाळीच्या साठेबाजांवर कारवाई वगैरे ठीक आहे, पण दिवाळी काही दिवसांवर आली असूनही तूरडाळीचे भाव अद्याप कमी झालेले नाहीत. सरकारने तूरडाळीचे भाव १२० प्रतिकिलो इतके निश्चित केल्याचे तसेच त्याहून अधिक दराने डाळ विक्री होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)आमचेही पर्याय खुले-उद्धवकल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाबाबत भाजपाने जर त्यांचा मार्ग निवडला असेल तर शिवसेनेसमोरही सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही आमचा मार्ग निवडू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दानवे यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, भाजपाने जर त्यांचा मार्ग निवडला असेल तर आम्हीही आमच्या मार्गाने जाऊ. भाजपाला शिवसेनेसोबत यायचे नाही हे दानवेंच्या विधानातून स्पष्ट झाले आहे. 1भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापालिका आणि नगर पंचायत निवडणुकांमधील यशापयशाचा आढावा घेण्यात आला. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेची मदत घेता येईल का, यावर विचार करण्यात आला. 2मात्र, मनसेच्या मदतीने एका महापालिकेत सत्ता घेतली तर शिवसेनेची त्यावर तीव्र हरकत असेल आणि राज्य सरकारमध्ये उगाच कुरबुरी वाढतील, असे मत एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेबरोबर अडीच अडीच वर्षे महापौरपद वाटून घेण्याचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचनाही समोर आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कल्याणमध्ये भाजपचाच महापौर होईल, असा दावा दानवे यांनी केला.3रात्र उशीरा दानवे यांनी कल्याण-डोंबिवलीतील काही नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.मनसेचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’आधी नैसर्गिक मित्रपक्षांचे काय होते ते पाहू. त्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवू, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (कडोंमपा) सत्तासमीकरणातील आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. कडोंमपातील मनसेच्या नवनिर्वाचित ९ आणि एका अपक्ष नगरसेवकाने मंगळवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. मनसेने तिकीट नाकारल्यानंतर प्रभाकर जाधव यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र, आपण मूळचे मनसैनिक असल्याचे सांगत ते मनसेच्या नगरसेवकांसमवेत राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.