‘महिला घरठाण हक्काचे’ राज्यात १०१ दावे दाखल

By admin | Published: March 8, 2017 12:40 AM2017-03-08T00:40:00+5:302017-03-08T00:40:00+5:30

सरकारने मान्य केलेल्या ‘महिलाघरठाण हक्काचे’ राज्यातील पहिले १०१ रीतसर दावे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आदिवासी

Claims 101 Claims in the State of Women's Home | ‘महिला घरठाण हक्काचे’ राज्यात १०१ दावे दाखल

‘महिला घरठाण हक्काचे’ राज्यात १०१ दावे दाखल

Next

अलिबाग : सरकारने मान्य केलेल्या ‘महिलाघरठाण हक्काचे’ राज्यातील पहिले १०१ रीतसर दावे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आदिवासी महिलांनी पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडेदाखल करून जागतिक महिला दिनाचे आगळे औचित्य साधले आहे. पेणमधील गांधी वाचनालयाच्या प्रांगणात यानिमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियमानुसार आदिवासी महिलांना आता घरठाणाचे हक्क प्राप्त झाले असून त्याकरिता, गेल्या २५ वर्षांपासून आदिवासी महिलांच्या घरठाणाचे हक्क मिळवण्याकरिता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंकुर ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून चळवळ सुरू आहे, त्यास जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला यशाची झालर प्राप्त झाली आहे. अंकुर ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून २९ मे, २००० रोजी, कुळकायदा कलम १७ (ब) अन्वये पेण तालुक्यातील दर्गावाडी, केतकवणे, मागाचीवाडी, ताडाचीवाडी, भोरकस, शेडाषी आणि बारशेत या सात वाड्यांचे १०१ घरठाणाचे अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Claims 101 Claims in the State of Women's Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.