रोडरोमीओंविरोधात कारवाईचा फास
By admin | Published: September 3, 2014 03:11 AM2014-09-03T03:11:22+5:302014-09-03T03:11:22+5:30
महिलांविरोधातील गुन्हे कमी व्हावेत, या उद्देशाने सुरू केलेल्या या कारवाईत आजवर पकडल्या गेलेल्या रोमीओंना ताकीद देऊन सोडण्यात येत होते.
Next
मुंबई : मुंबई पोलीस उद्यापासून रोड रोमीओंभोवती कारवाईचा फास आवळणार आहेत. महिलांविरोधातील गुन्हे कमी व्हावेत, या उद्देशाने सुरू केलेल्या या कारवाईत आजवर पकडल्या गेलेल्या रोमीओंना ताकीद देऊन सोडण्यात येत होते. उद्यापासून मात्र त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शाळा-महाविद्यालये, रेल्वे स्थानके, गच्च भरलेल्या बाजारपेठांपासून गल्लीबोळातल्या नाक्यांर्पयत महिलांची छेड काढणा:या रोडरोमीओंचा बंदोबस्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अॅन्टी इव्हटीङिांग पथके तयार केली आहेत. साध्या वेषातील पथक छेडछाड करणा:यांचे व्हिडीओ चित्रण आणि फोटो काढणार असून, छेडछाड करणा:यांना ताब्यात घेऊन त्यांना हे चित्रण दाखवले जाईल. त्यानंतर त्यांचे पालक, भावंडे किंवा प}ीला हे चित्रण दाखवण्यात येईल, अशी या अॅन्टी इव्ह टीङिांग पथकाची कार्यपद्धती आहे.
या कारवाईची सुरुवात उत्तर मुंबईतल्या पोलिसांनी केली. जेथे महिलांची, विद्यार्थिनींची छेड काढली जाते, टोमणो मारले जातात, ईल शेरेबाजी होते, पाठलाग होतो अशा ठिकाणांचा अभ्यास करून तेथे ही विशेष पथके तैनात करण्यात आली. आठवडाभरात उत्तर मुंबईतल्या पोलिसांनी 4क्क्हून अधिक रोडरोमीओंना ताब्यात घेतले. त्यांच्या कृतीचे चित्रण व्हिडीओ कॅमे:यात कैद केले. हे चित्रण त्यांच्या पालकांना दाखविण्यात आले. अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, लपून व्हिडीओ शूटिंग काढणो, ते पालकांना दाखवणो ही कारवाई मुंबईकरांसाठी नवी होती. मात्र आता अशीही कारवाई होऊ शकते याची पूर्ण जाणीव मुंबईकरांना झालेली आहे. त्यामुळे उद्यापासून अॅन्टी इव्ह टीङिांग स्क्वॉडने पकडलेल्या आरोपींना सोडून न देता त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विनयभंगापासून छेडछाड, ईल शेरेबाजी, पाठलाग या विविध कलमांतर्गत उद्यापासून गुन्हे दाखल होणार आहेत.
या कारवाईमुळे महिलांविरोधी गुन्हे कमी होतील, असा विश्वास आहे. त्यामुळे ही कारवाई पुढे सुरूच ठेवणार आहे, असे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उद्देश
च्व्हिडीओ चित्रण दाखवण्यामागे पालकांना आपला मुलगा घराबाहेर पडल्यावर काय करतो याची माहिती मिळावी, हा उद्देश आहे. त्याअनुषंगाने भविष्यात ते आपल्या मुलावर योग्य संस्कार करू शकतील, त्याच्यावर लक्ष देऊ शकतील.
च्धीर खचावा हाही उद्देश या कारवाईमागे आहे. प्रत्येक
ठिकाणी पोलीस आहेत, पोलिसांचे आपल्याकडे लक्ष
आहे ही जाणीव व्हावी, हाही हेतू या कारवाईमागे आहे.
यादीत होणार सहभाग
महिलांविरेधी गुन्हे करणा:या आरोपींची यादी पोलीस ठाण्यात तयार केली जात आहे. या यादीतल्या आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई होईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत. अॅन्टी इव्ह टीङिांग स्क्वॉडच्या कारवाईत पकडलेल्या रोडरोमीआेंची नोंद या यादीत केली जाणार आहे.
5क्क् कारवाया
26 ऑगस्टपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. आठवडाभरात शहरात पाचशेहून अधिक रोडरोमीओंची धरपकड झाली. त्यात उत्तर मुंबईत सुमारे चारशे कारवाया झाल्या आहेत.