'लालबागचा राजा' मंडपात पहिल्याच दिवशी सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:03 PM2022-08-31T12:03:37+5:302022-08-31T12:04:25+5:30

करोडो भाविक गणेशोत्सवाच्या काळात आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतील लालबाग या ठिकाणी येतात.

Clash between security guards and devotees on the first day at the 'Lalbaugcha Raja' Mandap | 'लालबागचा राजा' मंडपात पहिल्याच दिवशी सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये धक्काबुक्की

'लालबागचा राजा' मंडपात पहिल्याच दिवशी सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये धक्काबुक्की

googlenewsNext

मुंबई - मागील २ वर्ष कोविडच्या दहशतीमुळे गणेशोत्सवासह सर्वच सणांवर निर्बंध लावण्यात आले होते. परंतु यंदा सणांवरील निर्बंध हटवल्यामुळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी २४ तास भाविकांची प्रचंड गर्दी असते. गणेश चतुर्थीनिमित्त आज घरोघरी बाप्पाचं आगमन झालं. आजच्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. 

वेळोअभावी भाविकांनी राजाच्या दर्शनासाठी क्षणभरही मंडपात थांबता येत नाही. याठिकाणी महिला भाविक मंडपात उभी असताना महिला सुरक्षा रक्षकांनी तिला ढकललं असता महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. सुरक्षा रक्षक आणि महिला भाविकात धक्काबुक्की आणि शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. 

सकाळपासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने आले आहेत. त्यात महिला भाविक आणि महिला सुरक्षा रक्षक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. अनेकवेळा भाविक राजाच्या दर्शनानंतर काही क्षण उभे राहण्याचा प्रयत्न करतात परंतु वेळेमुळे याठिकाणी भाविकांना पुढे सरकवण्यासाठी धक्का दिला जातो. त्यातूनच हा वाद झाला. मात्र काही वेळानंतर सुरळीतपणे दर्शन सुरू झालं आहे. 

'लालबागचा राजा' इथं श्री राम मंदिराची प्रतिकृती
गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. परंतु यंदा शिंदे-फडणवीस सरकारने हे सर्व निर्बंध हटवल्यामुळे मोठ्या जल्लोषात भाविकांनी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू केली. मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी ११ दिवस भाविक अलोट गर्दी करतात. याठिकाणी यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते. करोडो भाविक गणेशोत्सवाच्या काळात आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतील लालबाग या ठिकाणी येतात. लालबागच्या राजाची सुरूवात कोळी बांधवांनी केली होती. कोविड निर्बंधानंतर यावेळी भाविकांनी पहिल्या दिवसापासून दर्शनासाठी रांग लावली आहे. 
 

Web Title: Clash between security guards and devotees on the first day at the 'Lalbaugcha Raja' Mandap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.