Join us

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सीईटी, नीटचे मोफत प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधाही मिळणार विनामूल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 6:51 AM

सरकारच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून हे प्रशिक्षण विनामूल्य देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सुविधाही पुरविली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील शिक्षणासाठी महत्त्वाच्या मानलेल्या नीट, सीईटी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून हे प्रशिक्षण विनामूल्य देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सुविधाही पुरविली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ओबीसींसह मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा आहे. ३१ मार्चपर्यंत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

महाज्योती योजना- सीईटी, नीटचे मोफत प्रशिक्षणमहाज्योती योजना नीट, सीईटीचे मोफत प्रशिक्षण भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. त्यांना खासगी क्लास लावणे शक्य होत नाही. ही परिस्थिती करिअरच्या आड येऊ नये, यासाठी सरकारने महाज्योती योजना सुरू केली आहे. 

कोणते विद्यार्थी पात्र ?मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत, त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा.

घरबसल्या करा ऑनलाइन अर्जhttps://mahajyoti.org.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

३१ मार्चपर्यंतची मुदतऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. ऑनलाइन अर्ज केल्याशिवाय प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही.

प्रशिक्षणासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी टॅबही मोफतऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना नीट, सीईटी परीक्षेचे पूर्वप्रशिक्षण व या परीक्षेच्या अभ्यासासाठी महाज्योती संस्थेकडून मोफत टॅब देण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांचे आवाहनसरकार विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार करून नीट, सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण देणार आहे. याचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने वाटचाल करावी. यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल तर संपर्क साधावा.

टॅग्स :शिक्षण