ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा निकाल ८८.३३ टक्के लागला असून एकूण ९०.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ९४.०८ टक्के मुली तर ८७.२८ टक्के मुले पास झाली असून जिल्ह्यात मुरबाड नंबर वन ठरला आहे. मुरबाड तालुक्याचा निकाल ९२.१६ टक्के लागला आहे. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याने या निकालावर चांगलीच छाप पाडली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये १ लाख ७८१ पैकी ९२ हजार ७६८ विद्यार्थी पास झाले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९३.३० टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.४, कला शाखेचा ८४.८९ तर व्यावसायिक शाखेचा निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. एकूण ९ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांची सरासरी गाठली असून ३४ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४८ हजार १८३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६ हजार २२ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. रिपीटर्स उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मात्र पुन्हा एकदा घसरले आहे. एकूण ११ हजार ३४० पैकी ५ हजार ५८७ रिपीटर्स पास झाले असून हे प्रमाण ४९.२७ टक्के एवढे आहे. विषयनिहाय पाहिल्यास एकंदर १३२ विषयांमधील उत्तीर्णांचा आकडा हा ९० च्या घरात असून केवळ पाली भाषेचे ५० टक्के विद्यार्थी ठाण्यात उत्तीर्ण झाले. कानडी, पर्यावरण, पिक्टोरियल कॉम्पिसेशन, बँकिंग-२, बँकिंग-३, आॅफिस मॅनेजमेंटचे तीन पेपर, पोल्ट्री एज्युकेशन, संगीत, मूल्यशिक्षण, या विषयांमध्ये सर्व विद्यार्थी पास झाले.अंध विद्यार्थिनीचे सुयशवाडा तालुक्यातील सोनाळे कनिष्ठ महाविद्यालयाची अंध विद्यार्थीनी अंकिता शशिकांत राऊत हिने ७४ टक्के गुण मिळवले असून तिचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे. अंकिताने रायटर म्हणून तिच्या लहान बहिणीची मदत घेतली होती. वाडा तालुक्यातील चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे. स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा निकाल ७२.०५, आंबिस्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा ९६.८८, उचाट महाविद्यालयाचा ८४.४२, ह. वि. पाटील कनिष्ठ महाविद्यालय चिंचपरचा ८८.३९ टक्के लागला आहे. या विद्यालयाच्या स्व. सौ. कामिनी द. अधिकारी कला शाखेतून स्रेहल सातवी ८२.१५ टक्के गुण मिळवून प्रथम. स्व. सौ. गोदावरी पा. अधिकारी वाणिज्य शाखेतून मीरा प्रजापती ८५.३८ टक्के गुण मिळवून प्रथम तर श्रीमती मंज म. अग्रवाल विज्ञान शाखेतुन रविंद्र डंगले ७१.०८ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विनोद अधिकारी यांनी सांगितले की यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये ४० ते ५० टक्के गुण होते परंतु विद्यालयाच्या प्राध्यापकानी एक्स्ट्रा क्लासेस घेवून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला.