दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणात वर्गमित्राला अटक; धार्मिक टिप्पणीवरून वाद अन् भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:40 AM2023-04-10T05:40:31+5:302023-04-10T05:40:49+5:30

मुंबई : पवई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्याप्रकरणात विशेष तपास पथकाने वर्गमित्र अरमान खत्री (१९) याला अटक केली आहे. ...

Classmate arrested in Darshan Solanki suicide case Controversy and fear over religious commentary | दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणात वर्गमित्राला अटक; धार्मिक टिप्पणीवरून वाद अन् भीती

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणात वर्गमित्राला अटक; धार्मिक टिप्पणीवरून वाद अन् भीती

googlenewsNext

मुंबई :

पवई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्याप्रकरणात विशेष तपास पथकाने वर्गमित्र अरमान खत्री (१९) याला अटक केली आहे.  दर्शनच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीतही ‘अरमान तू मला मारलेस’ असे नमूद केले होते. तसेच, आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दर्शनने केलेल्या धार्मिक टिपणीनंतर अरमानने कटर दाखवून त्याला घाबरवल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. 

दर्शन सोलंकीने १२ फेब्रुवारी रोजी आयआयटी मुंबईतील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. दर्शनच्या खोलीत ३ मार्च रोजी सापडलेल्या चिठ्ठीत अरमानचे नाव लिहून त्याच्या छळाला कंटाळून स्वत:ला संपवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थी आणि दर्शन यांच्यातील काही चॅटही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यानंतर, पवई पोलिसांनी दर्शनच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून  आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुसाइड नोटमधील हस्ताक्षर दर्शनचेच असल्याबाबतचा अहवाल गुन्हे अन्वेषण विभागाच्या हस्ताक्षर विश्लेषण कक्षाने गुन्हे शाखेला सादर केला आहे.  

त्याला गावी जायचे होते
एका विद्यार्थ्यांच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीत,  दर्शनला गावी अहमदाबादला जायचे होते. मात्र, अरमान तेथेही आपल्याला त्रास देईल, या भीतीने तो गेला नाही. अरमान काही तरी हानी पोहाेचवेल, याच भीतीतून त्याने आत्महत्या केल्याचा संशय वर्तवला आहे.

- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खत्रीचा जबाब नोंदविण्यात आला आहे.  १० फेब्रुवारी रोजी सोलंकीने आपली माफी मागितल्याचेही सांगितले; पण या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती दिलेली नाही. अधिक चौकशीसाठी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 
- न्यायालयाने त्याला १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीत आत्महत्येच्या पाच दिवसांपूर्वी दर्शनने अरमानवर धार्मिक टिप्पणी केली. याच रागात अरमानने कटर दाखवून त्याला बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो घाबरला होता. दर्शनने वेळोवेळी माफीदेखील मागितली. 
- या प्रकारानंतर त्याला दिवसाआड तापही येत होता. याच भीतीतून त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज तपास वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंतचा तपासात कुठेही जातीभेदाचे कनेक्शन समोर आले नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. जातीभेदावरून झालेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत होता. 

Web Title: Classmate arrested in Darshan Solanki suicide case Controversy and fear over religious commentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.