मुंबई : भाजपाचे नेते मोहित कंबोज यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.
२०११ ते २०१५ या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण कंबोज यांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले होते, त्यासाठी कर्जरक्कम न वापरता ती अन्यत्र वापरल्याचा आरोप आहे. ५२ कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी कंबोज व त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला. फसवणूक व कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याच प्रकरणात त्यांना क्लीन चिट देण्यात आली.