वर्धेत होणार स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:56 AM2019-09-19T04:56:24+5:302019-09-19T04:56:27+5:30

वर्धेनजीकच्या सेवाग्राम येथे स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Clean India University to be held in Wardha | वर्धेत होणार स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ

वर्धेत होणार स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ

Next

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीस स्वच्छ भारत ही आदरांजली ठरावी यादृष्टीने वर्धेनजीकच्या सेवाग्राम येथे स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, औरंगाबाद पालिकेचे आयुक्त निपुण विनायक, कोल्हापूरचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छता विभागाचे उपसचिव, आयआयटीचे प्राध्यापक वीरेेंंद्र शेट्टी, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव, डॉ. अश्विनी कुमार शर्मा, प्रा. अमोल देशमुख हे सदस्य आहेत तर विद्यापीठ शिक्षणचे उपसचिव हे समन्वय अधिकारी असतील. समिती पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालये याबरोबरच अभ्यासक्रम, मनुष्यबळ यांचा अभ्यास करुन दोन महिन्यांमध्ये शासनास अहवाल सादर करेल.

Web Title: Clean India University to be held in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.