कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:15 AM2020-12-04T04:15:37+5:302020-12-04T04:15:37+5:30

एका प्रभागासाठी ९० जणांची निवड : मास्क न लावणाऱ्यांवर ठेवणार नजर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन ...

Clean-up marshal for corona eradication | कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शल

कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शल

Next

एका प्रभागासाठी ९० जणांची निवड : मास्क न लावणाऱ्यांवर ठेवणार नजर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जे मास्क लावणार नाहीत; अशांवर मुंबई महापालिकेने वेगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी क्लीन-अप मार्शलची मदत घेतली जात असून, याबाबत झालेल्या करारानुसार दंडाद्वारे प्राप्त झालेल्या रकमेतील ५० टक्के रक्कम पालिकेला क्लीन-अप मार्शलची नेमणूक करणाऱ्या संस्थांना द्यावी लागत आहे.

कोरोना रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार आहेत. पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याचबरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर आता ‘क्लीन-अप मार्शल’ही या कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने संस्थांच्या माध्यमातून एका प्रभागात ९० अशा प्रकारे २४ प्रभागांत २,१६० क्लीन-अप मार्शल नेमले असून, त्यांना टार्गेट देण्यात आले आहे.

* १० कोटींची दंड वसुली

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विनामास्क आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून महापालिकेने आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

............................

Web Title: Clean-up marshal for corona eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.