Join us

स्वच्छ शौचालय, खेळाचे मैदान मुलींचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 1:37 AM

सार्वजनिक जागांवर वावरताना वस्तीतील किशोरवयीन मुलींनीही आपल्या मागण्या व अपेक्षांचे गर्ल्स चार्टर ऑफ डिमांड- २०१९ तयार केले आहे.

मुंबई : सार्वजनिक जागांवर वावरताना वस्तीतील किशोरवयीन मुलींनीही आपल्या मागण्या व अपेक्षांचे गर्ल्स चार्टर ऑफ डिमांड- २०१९ तयार केले आहे. याद्वारे वस्तीतील शौचालये, खेळाचे मैदान आणि सार्वजनिक वृत्तपत्राचे वाचनालय येथे सुरक्षित प्रवेश मिळणे, हा त्यांचा अधिकार असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून येत्या लोकसभा निवडणुकीत त्या उमेदवारांपर्यंत पोहोचविणार असल्याची माहिती सर्वेक्षण केलेल्या लर्निंग कम्युनिटीद्वारे देण्यात आली.या निरनिराळ्या प्रभागांत वस्तीतील मुलींकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणादरम्यान वस्तीमधील ८५ % मुली या सार्वजनिक शौचालय वापरत असल्याचे समोर आले. मात्र, या ठिकाणी अपुरा उजेड, पाणीपुरवठा आणि दरवाजे-खिडक्या यांच्या दुर्दशेमुळे तिथे जाण्यास असुरक्षित वाटत असल्याचे उघडकीस आले. याचप्रकारे, वस्तीमधील ८६.४ % मुलींना योग्य सुविधांअभावी आणि सार्वजनिक ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने, सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचा वापर करण्यास भीती वाटत असल्याचेही समोर आले. सर्वेक्षणादरम्यान, केवळ ८ % मुली वस्तीतील खेळाच्या मैदानाचा वापर करतात. ४० % मुलींच्या सांगण्यावरून त्या जागेचा वापर सार्वजनिक वाहनतळ म्हणून होतो आणि तिथे मुलांची मक्तेदारी चालते. त्यामुळे त्यांना त्याचा वापर करण्यास अडथळे येतात. त्यांच्या मागण्या आता वस्तीतील धोरणकर्ते, वस्तीतील प्रमुख नेते यांच्यापर्यंत पोहोचविणेया हा कम्युनिटीचा मुख्यअसल्याची माहिती सर्वेक्षणकर्त्या मुलींनी दिली.>निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणलर्निंग कम्युनिटी अंतर्गत कोरो, अक्षरा, वाचा, स्त्रीमुक्ती संघटना, दोस्ती, आंगन, एम्पॉवर, ब्राइट फ्युचर, वाइडब्ल्यूसीए या सेवाभावी संस्था वस्तीतील मुलींच्या सार्वजनिक वावरावर येणारी बंधने आणि त्यांच्या त्यासाठी असलेल्या मागण्या यावर गेली काही काम करत आहेत. त्यांचे हे सर्वेक्षण ‘अब नहीं तो कब - द टाइम इज नाऊ’ या उपक्रमाने ओळखले जात असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील सर्वेक्षण म्हणजे या उपक्रमाचा भाग आहे.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019