Join us

दादर स्थानकात ‘सफाई काम बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:30 AM

दादर स्थानकातील चार कंत्राटी कामगारांचे कंत्राट बुधवारी संपले. त्यानंतर नवीन कंत्राटामध्ये त्यांना कोणतीही माहिती न देता कामावरून कमी करण्यात आले.

मुंबई : दादर स्थानकातील चार कंत्राटी कामगारांचे कंत्राट बुधवारी संपले. त्यानंतर नवीन कंत्राटामध्ये त्यांना कोणतीही माहिती न देता कामावरून कमी करण्यात आले. इतर कामगारांनी याबाबत विचारणा केली असता, कामावरून काढण्यात येइल, असे वरिष्ठांकडून धमकाविण्यात आले. कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी कामगारांनी दादर स्थानकात सफाई काम बंद केले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चार कामगारांना कामावर रूजू न केल्यास शुक्रवारी मध्य रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून देण्यात आला.दादर स्थानकात ९३ कंत्राटी सफाई कामगार आहेत. अनेक वर्षांपासून कंत्राटावर काम करत आहेत. मात्र, नवीन वर्षात दादर स्थानकातील सफाई कामगारांचे कंत्राट संपल्याने २ जानेवारी रोजी नवीन कंत्राटदाराची नेमणूक झाली. या नवीन कंत्राटदाराने चार कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली. चार कामगारांच्या हक्कांसाठी दादर स्थानकात गुरुवारी सायंकाळपासून सफाई काम बंद करण्यात आले आहे. संघटित व असंघटित कामगारांचा यात समावेश आहे.गुरुवारी रात्रीपर्यंत कामगारांना कामावर रुजू केले नाही तर, शुक्रवारी मध्य रेल्वे मार्गावर सफाई काम बंद आंदोलन करण्यात येईल, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी सांगितले....तर सर्वत्र अस्वच्छतादादर स्थानकातील सफाई कामगारांनी आंदोलन केल्याने एक्स्प्रेस, स्थानकाची स्वच्छता राहून गेली आहे. या आंदोलनाची तीव्रता वाढल्यास मध्य रेल्वेमार्गावरील सफाई कामगार आंदोलन करतील. परिणामी सर्व स्थानकांवर अस्वच्छता पसरेल. प्रवाशांना अस्वच्छ स्थानकातून आणि लोकल, एक्स्प्रेसमधून फिरावे लागेल.