Join us

सुविधांचा जिना सरकेचना!, वांद्रे स्थानकात सरकते जिनेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 6:18 AM

मुंबई : पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकातील महत्त्वाचे स्थानक म्हणेज वांद्रे. या स्थानकाला ‘हेरिटेज’चा दर्जा आहे.

सागर नेवरेकर /कुलदीप घायवट।मुंबई : पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वे स्थानकातील महत्त्वाचे स्थानक म्हणेज वांद्रे. या स्थानकाला ‘हेरिटेज’चा दर्जा आहे. मात्र, सुविधांच्या बाबतीत विचार केला, तर येथील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. अरुंद पूल येथील मोठी समस्या असून, येथे सरकते जिनेदेखील नाहीत.वांद्रे स्थानकावर मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेअभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. गंजलेले पूल, रेल्वेच्या हद्दीत कचºयाचे साम्राज्य, रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत झोपड्या असे चित्र येथे पाहायला मिळते. या झोपड्यांवर कारवाई होत नसल्याने, वांद्रे स्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त झाले असल्याचे प्रवासी सांगतात.वांद्रे येथे विविध प्राधिकरणांची कार्यालये आहेत. माउंट मेरी हे प्रसिद्ध चर्च येथे आहे. वांद्रे उपनगरीय क्षेत्र, तसेच वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) हे आधुनिक व्यावसायिक क्षेत्र येथे आहे.वांद्रे टर्मिनस व वांद्रे रेल्वे स्थानक जवळ असून, पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्या येथून धावतात. त्यामुळे हे स्थानक सतत गजबजलेले असते, तरीही येथे असणाºया प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेणारी व्यवस्था स्थानकात पाहायला मिळत नाही.>स्कायवॉकची दुरवस्थावांद्रे स्थानकावर पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही दिशेला स्कायवॉक बांधले आहेत, परंतु या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. पूर्वेकडील स्कायवॉकवरील लाद्या उखडलेल्या आहेत. कचराकुंड्या गायब झाल्या आहेत, तसेच पश्चिमेकडील स्कायवॉकवरदेखील लाद्या उखडलेल्या आणि कचराकुंडी गायब झाली आहे, तसेच स्कायवॉकवर तृतीयपंथीयांचे वास्तव असल्याने स्कायवॉकवर अस्वच्छता असते.>कारवाईत विघ्नवांद्रे स्थानकांच्या पूर्वेकडील अनधिकृत झोपड्यावर कारवाई केल्यावर, राजकीय मंडळी हजर होऊन कारवाईमध्ये अडथळा निर्माण करतात, त्यामुळे येथे कारवाई होत नाही. मतपेटी राखण्यासाठी येथील अनधिकृत झोपड्यांना पाठिंबा दिला जातो, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.जादा भाडेवसुलीरिक्षाचालक ज्यादा भाडे वसूल करतात. पश्चिमेकडील बँडस्टँड येथील समुद्रकिनारा, तसेच बॉलीवूड अभिनेत्यांची घरे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.रॅम्पची सुविधा नाहीदिव्यांगांसाठी व्हीलचेअर रॅम्पची सुविधा नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या वांद्रे स्थानकावरून धावतात. दिव्यांगांनी प्रवास कसा करावा? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.व्यावसायिक केंद्रवांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) हे एक व्यावसायिक केंद्र तयार झाल्यामुळे, स्थानकांवर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे, परंतु त्या तुलनेने पायाभूत सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन कमी पडत आहे.>शासकीय कार्यालये, सरकारी वसाहत येथे आहे. बीकेसी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक केंद्र आहे. त्यामुळे बीकेसी ते कुर्ला येथून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे, तसेच वांद्रे टर्मिनल आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होते. मुजोर फेरीवाले, रिक्षावाल्यांनी पदपथ अडवून ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात चेंगराचेंगरीचे प्रकार होऊन मनुष्यहानी होण्याचे प्रकार घडू शकतात. चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.- शरद यादव, माहिती अधिकार कार्यकर्ता

वांद्रे स्थानकावरील मूलभूत सुविधांबाबत रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. रेल्वे प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.- तृप्ती सावंत, आमदारवांद्रे स्थानकावरील फुटओव्हर ब्रिजवर रोज ५० हजार प्रवासी बीकेसीकडे प्रवास करतात. सकाळच्या वेळेत पाय ठेवायलाही जागा नसते, एवढी गर्दी पुलावर होते. पूल अरुंद असून, ५० हजार लोकांचा भार सांभाळणे कठीण आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी, यासाठी त्यांना पत्रव्यवहार केला आहे, परंतु अजून रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.- हजी हलीम खान, नगरसेवकवांद्रे स्थानकाला ग्रेड ए-वन ऐतिहासिक वारसा लाभला आहे, म्हणून त्याला धक्का पोहोचू नये, या कारणाने जर नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्या जाणार नाहीत, हे पटण्यासारखे नाही. सीएसएमटी स्थानकालासुद्धा गे्रड ए-वनचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, परंतु ऐतिहासिक वास्तूला धक्का न लागता, प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.- चेतन रायकर, सदस्य,मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीमी नगरसेवक असताना वांद्रे स्थानकाच्या पश्चिमेला पोलीस बीट चौकी व्हावी, यासाठी पत्रव्यवहार केला होता. रिक्षा स्टँड आणि बस डेपो बाजूबाजूला आहेत, तसेच प्रवासीदेखील मिळेल त्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन झाले पाहिजे. ऐतिहासिक दर्जा मिळालेल्या स्थानकांची सुंदरता ही टिकून राहिलीच पाहिजे, परंतु प्रवाशांना सुविधा मिळाल्या पाहिजेत.- रहेबर खान राजा, माजी नगरसेवकफलाट क्रमांक १ वर तिकीट घर आहे. तिथे प्रवाशांची तिकिटासाठी प्रचंड गर्दी होते. प्रवाशांना तिकीट घरातील खिडक्या अपुºया पडत आहेत, तसेच तिकीट घर अस्वच्छ असते. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. - राजेंद्र सावंत, प्रवासीवांद्रे रेल्वे स्थानजवळच्या झोपडपट्टीतील रहिवाशांचे पर्यायी जागेवर स्थलांतर करणे, तसेच स्थानकावरील सर्व परिसर फेरीवाला व तृतीयपंथीमुक्त करणे, पोलीस बंदोबस्त २४ तास असणे, सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या दर्जाचे लावणे व सतत कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.- हितेंद्र वळवईकर, प्रवासीवांद्रे पश्चिमेकडील फलाट क्रमांक १ जवळील स्कायवॉकचा वापर केला जात नाही, तसेच सकाळी आणि सायंकाळी प्रचंड गर्दी होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.- हिना अर्लोनकर, प्रवासीवांद्रे रेल्वे स्थानकच्या बाजूने झोपडपट्टी आहे. संबंधितांचे पुनर्वसन झाले पाहिजे. महिलांसाठीच्या मूलभूत सुविधा अपुºया आहेत.- रुची प्रधान, प्रवासीवांद्रे स्थानकालगतच्या झोपड्या आणि दुकानामुळे येथील समस्या वाढत आहेत. गर्दीचेही हेच कारण आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गर्दीचे नियोजन करावे.- समृद्धी शेठ, प्रवासीसुविधांच्या नावाने बोंब आहे. गाडीत चढायला-उतरायला जागा मिळत नाही. एल्फिन्स्टनसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते.- नीरज चतुर्वेदी, प्रवासी>सूचना, तक्रारी, व्हिडीओ‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा -हास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास८८४७७४१३०१या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.