‘वंदे भारत’ची अवघ्या १४ मिनिटांत स्वच्छता; रेल्वेच्या इतिहासात विक्रमी वेळेची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:25 AM2023-10-02T10:25:33+5:302023-10-02T10:25:57+5:30

सोलापूर-मुंबई, मुंबई-साईनगर शिर्डी आणि बिलासपूर-नागपूर वंदे भारत ट्रेनसह देशभरातील सर्व वंदे भारत ट्रेनची अवघ्या १४ मिनिटांत स्वच्छता करण्यात आली आहे.

Cleaning of 'Vande Bharat' in just 14 minutes; A record time in the history of railways | ‘वंदे भारत’ची अवघ्या १४ मिनिटांत स्वच्छता; रेल्वेच्या इतिहासात विक्रमी वेळेची नोंद

‘वंदे भारत’ची अवघ्या १४ मिनिटांत स्वच्छता; रेल्वेच्या इतिहासात विक्रमी वेळेची नोंद

googlenewsNext

मुंबई : सोलापूर-मुंबई, मुंबई-साईनगर शिर्डी आणि बिलासपूर-नागपूर वंदे भारत ट्रेनसह देशभरातील सर्व वंदे भारत ट्रेनची अवघ्या १४ मिनिटांत स्वच्छता करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रेल्वेने रविवारी प्रथमच विक्रमी वेळेत अशी ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

रविवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडीओ लिंकद्वारे स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून अवघ्या १४ मिनिटांत देशभरातील सर्व वंदे भारत ट्रेनची स्वच्छता केली आहे. अशी कामगिरी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाचवेळी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ करण्यात आल्या. सर्व झोनचे महाव्यवस्थापक, सर्व विभागांचे विभागीय व्यवस्थापक, विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी आपापल्या परिमंडळ/विभागातील कार्यक्रमास उपस्थित होते. मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या रेकच्या दर्जेदार साफसफाईसाठी नवीन “१४ मिनिटांचा चमत्कार” योजना स्वीकारली आहे. ही नवीन योजना १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. सोलापूर-सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, सीएसएमटी-साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसची साईनगर शिर्डी येथे आणि बिलासपूर -नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसची नागपूर स्थानक येथे स्वच्छता करण्यात आली.

 सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर ट्रेन आल्यानंतर आणि सर्व प्रवासी उतरल्यानंतर दुपारी १२:४२ वाजता साफसफाई सुरू झाली. १२:४२ ते १२:५६ वाजता विक्रमी १४ मिनिटांत स्वच्छता पूर्ण झाली.

 या स्वच्छता मोहिमेमध्ये ४४ सफाई कर्मचाऱ्यांची ए, बी आणि सी अशी टीम नियुक्त केली होती. स्वच्छतागृहे, रॅक, पटल, आसन, फ्लोरिंग आणि कोचच्या बाहेरील भागासह आतील भागाची सखोल साफसफाई करण्यात आली.

 शौचालयात पॅन सीट, काच इत्यादी साफ करण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यात आला.

Web Title: Cleaning of 'Vande Bharat' in just 14 minutes; A record time in the history of railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.