वर्सोव्यात विविध ठिकाणी राबवले स्वच्छता अभियान

By मनोहर कुंभेजकर | Published: October 1, 2023 04:13 PM2023-10-01T16:13:53+5:302023-10-01T16:14:01+5:30

या स्वच्छता मोहिमेला  येथील नागरिकांचा व विद्यार्थ्यांनीचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

Cleanliness campaign conducted at various places in Varsova | वर्सोव्यात विविध ठिकाणी राबवले स्वच्छता अभियान

वर्सोव्यात विविध ठिकाणी राबवले स्वच्छता अभियान

googlenewsNext

मुंबई- वर्सोवा विधानसभेच्या भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली वर्सोवा विधानसभा क्षेत्रामध्ये सेवा ही स्वच्छता या अभियाना अंतर्गत मँग्रोज क्लीन अप तसेच बीच क्लीन अप करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेला  येथील नागरिकांचा व विद्यार्थ्यांनीचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त  प्रतिसाद देत एक साथ एक तास स्वच्छता या उपक्रमामध्ये जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेली दिसून आली. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून व पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे स्वच्छते विषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे व वर्सोवा विधानसभा क्षेत्रामध्ये यापुढे स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया  आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी दिली. यावेळी  त्यांनी सफाई कामगारांना टी-शर्ट व कॅप ( टोप्या ) चे वाटप केले.

यावेळी स्थानिक जनतेसह माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर, माजी नगरसेविका रंजना पाटील, प्रसिद्ध अभिनेता ओमकार कपूर तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्राफिक पोलीस इन्स्पेक्टर व त्यांचे अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

Web Title: Cleanliness campaign conducted at various places in Varsova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.