गांधी जयंतीनिमित्त छात्रभारतीचे स्वच्छता अभियान
By admin | Published: October 2, 2016 06:44 PM2016-10-02T18:44:22+5:302016-10-02T18:44:22+5:30
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले ज्ञात बलिदान देणारे शहीद बाबू गेणू यांच्या केईम हॉस्पिटलसमोर स्थित पुतळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले ज्ञात बलिदान देणारे शहीद बाबू गेणू यांच्या केईम हॉस्पिटलसमोर स्थित पुतळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली होती. पुतळ्यावर धूळ व पक्षांची विष्ठा साठलेली होती. गांधी जयंतीचे औचित्य साधून छात्रभारतीने सदर पुतळ्याची साफसफाई केली. आठवड्यातील दर शुक्रवारी या पुतळ्याची साफसफाई करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली .
शहिदांच्या नावावर राजकारण करणारे लोक प्रतिनिधी व प्रशासन शहिदांच्या स्मृती जपण्यास असमर्थ ठरलेले आहेत. शहिदांचा वारसा जपण्यासाठी आजची पिढी कटिबद्ध असताना त्यांच्या स्मृतीस्थळांचा वारसा देखील जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असे मत छात्र भारतीचे राज्य सदस्य प्रमोद दिवेकर यांनी व्यक्त केले. सफाईसाठी छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव, उपाध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई संघटक रोहित ढाले, विशाल कदम, मोहन गायकवाड हे उपस्थित होते.