लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर शहराजवळील पिकनिक स्पॉटकडे धाव घेतात. पावसाळ्यात धबधब्यावर मनमुराद भिजण्याची मज्जा अनुभवायला शनिवार-रविवारी सहकुटुंब जाणाºयांची संख्यादेखील लक्षणीय आहे. उपनगरांतील धबधब्याच्या स्वच्छतेसाठी ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेने धाडसी उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत संस्थेने जुलै महिन्यात तब्बल पाच हजार किलो कचरा गोळा केला. यात मद्यपानाच्या बाटल्यांचे प्रमाण अधिक आहे. यासाठी कडक कायदा करण्यात सरकार मागे पडत असल्याचे स्पष्ट होते. मद्यपान करणाºया पर्यटकांमुळे अपघाती मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे.खोपोली, कर्जत, भिवपुरी, कल्याण, बोरीवली, वसई आदी ठिकाणी धबधबे आणि नद्या अशा पर्यटनस्थळी जाण्याला पर्यटक पसंती देतात. मुंबई आणि ठाणे शहरातील अनेक पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी ‘वर्षासहल’ आयोजित करतात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारा पर्यटकच पर्यावरणाचा ºहास करत असल्याचे दिसून येते.धबधब्याच्या परिसरात पर्यटक मद्यपानासह जेवणाचा बेत आखतात. मद्यपानानंतर बाटल्या आणि जेवणावळीसाठीच्या प्लॅस्टिकच्या पत्रावळी तेथेच टाकतात. ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ’ या संस्थेतर्फे मुंबईजवळील असलेल्या आठ धबधब्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.या मोहिमेंतर्गत पाच हजार किलो कचºयाचे संकलन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कचºयात दारूच्या बाटल्यांचे प्रमाण जास्त असून थर्माकोल डिश यासोबत पर्यटकांनी फेकून दिलेल्या कपड्यांचाही समावेश आहे. संस्थेने आतापर्यंत आठ धबधब्यांवरून ५ हजार किलो कचरा जमा केला आहे.धबधबा क्षेत्रात हे उपाय कराधबधबा क्षेत्रात दारुबंदी करणे, कचराकुंडीची व्यवस्था करणे, कपडे बदलण्यासाठी आवश्यक कक्ष बांधणे, शौचालयाची व्यवस्था करणे, धबधब्यांची माहिती देणारे फलक लावणे, धबधब्याकडे जाण्यासाठी शुल्क आकारणे, सुरक्षारक्षकांची सोय करणे यासारख्या सूचना संस्थेतर्फे पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आल्या होत्या. संस्थेने पर्यटन विकास मंडळाचे जिल्हाधिकारी आणि अधिकाºयांना कारवाई करण्याबाबत पत्र पाठविले आहे.निसर्गसंपत्ती हे आपले वैभवमहाराष्ट्र सुंदरतेने आणि नैसर्गिक प्रकृतीने नटलेला असून धबधबे, नद्या, किल्ले, देऊळ हे आपले वैभव आहे. त्यांना जपणे खूप गरजेचे आहे. नैसर्गिक संपत्तीची जपणूक केली नाही तर राज्याला मोठी हानी होईल. राज्यात छोटे छोटे निसर्गरम्य पिकनिक स्पॉट आहेत. सरकारने याला पर्यटनाचा अधिकार दिला, तर लोकल टुरिझममधून राज्याला खूप मोठा निधी निर्माण होऊ शकतो. तसेच युवापिढीने ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ’ मोहिमेसारख्या संस्थेत सहभागी व्हावे. तरच बदल शक्य आहे.- धर्मेश बरई, मुख्य समन्वयक, एन्व्हायर्नमेंट लाइफ
धबधब्यांवर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:52 AM