मुंबई : स्वच्छतेबाबत मुंबई महापालिकेची परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय स्वच्छता निरीक्षक मुंबईत येणार आहेत. मात्र, पूर्वकल्पना न देताच, आकस्मिक होणाºया या परीक्षेमुळे पालिका अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे. हे पथक कधीही कोणत्याही ठिकाणी अचानक हजेरी लावणार असल्याने, सर्व सहायक आयुक्तांना सतर्क राहण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. त्यानुसार, प्रत्येक विभागाचा स्वच्छता अहवाल दररोज तयार होणार आहे.
स्वच्छतेच्या परीक्षेत गतवर्षी मुंबई हे राज्यातील सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले होते, तर केंद्र स्तरावर मुंबईचा क्रमांक १८वा होता. मात्र, त्या वेळेस स्वच्छता निरीक्षकांनी मुंबईत येण्याआधी महापालिका प्रशासनाला पूर्वकल्पना दिली होती, परंतु या वेळेची स्पर्धा त्याहून वेगळी असणार आहे. झोपडपट्टी असो किंवा उत्तुंग इमारती केंद्राचे स्वच्छता निरीक्षक सांगतील त्या ठिकाणी त्यांना नेणे पालिका अधिकाºयांना बंधनकारक असणार आहे.पाच हजार गुणांची परीक्षाया वर्षी स्वच्छता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एक हजार गुण वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल पाच हजार गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. यामध्ये १,२५० गुण हे केवळ परीक्षकाच्या निरीक्षण, तसेच कचरा वर्गीकरण व प्रक्रिया प्रकल्प आदी गोष्टींसाठी असणार आहे. त्यामुळे आपापल्या विभागात दररोज सकाळी ७.३० ते ८.०० दरम्यान पाहणी करून, त्याचे छायाचित्र व दैनंदिन अहवाल परिमंडळीय उपायुक्तांना पाठविण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.शौचालयांच्या दुरुस्तीवर भर
च्२०१८ मध्ये स्वच्छतेसाठी चार हजार गुण होते. त्यात वाढ करून या वर्षी पाच हजार गुण करण्यात आले आहेत.च्स्वच्छतेचा दर्जा आणि शौचालयांची व्यवस्था यामध्ये महापालिकेला कमी गुण होते. त्यामुळे गेल्या वर्षभरात सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व नवीन शौचकुपी वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला.च्स्वच्छता अॅप, स्वच्छ सर्वेक्षण २०१९ हे संकेतस्थळ आणि १९६९ या क्रमांकाच्या माध्यमातून मुंबईतील स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद महापालिका घेत आहे. केंद्राचे निरीक्षक ३१ जानेवारी, २०१९ पूर्वी कधीही मुंबईत हजेरी लावू शकतात. त्यामुळे सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील स्वच्छतेच्या परिस्थितीची दररोज सकाळी ७.३० ते ८.०० दरम्यान पाहणी करावी.च्या पाहणी दरम्यानची छायाचित्रे व दैनंदिन अहवाल आपल्या संबंधित परिमंडळीय उपायुक्तांना व घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्तांना पाठवावे, अशी ताकीद आयुक्तांनी दिली आहे.स्वच्छतेत मुंबईचा क्रमांक
2016 - 10
2017 - 29
2018 - 18