झोपडपट्ट्यांतील स्वच्छतेला आला वेग

By admin | Published: June 30, 2015 03:19 AM2015-06-30T03:19:15+5:302015-06-30T03:19:15+5:30

महापालिकेच्या वतीने झोपडपट्टी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, पावसाळ्यात फैलावणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

Cleanliness of slums | झोपडपट्ट्यांतील स्वच्छतेला आला वेग

झोपडपट्ट्यांतील स्वच्छतेला आला वेग

Next

मुंंबई : महापालिकेच्या वतीने झोपडपट्टी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, पावसाळ्यात फैलावणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक विभागामध्ये किमान १० याप्रमाणे महापालिकेच्या २४ विभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.
आयुक्त अजय मेहता यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रातील सर्व विभागांमध्ये झोपडपट्टी परिसरात उपआयुक्त, सहायक आयुक्त यांच्या देखरेखीखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. झोपडपट्टी परिसरातील कचरा उचलून वाहून नेणे, सांडपाण्याच्या मार्गिका स्वच्छ करणे, साचलेल्या पाण्याची ठिकाणे स्वच्छ करून पाणी प्रवाहीत करणे, स्वच्छता करण्यात आलेल्या भागांमध्ये व गल्ल्यांमध्ये डासप्रतिबंधक औषधांची धूम्र फवारणी करणे या उपाययोजना सर्व भागांमध्ये करण्यात येत आहेत. सुमारे २५० पेक्षा जास्त परिसरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पावसाळ्यात फैलावणाऱ्या आजारांना प्रतिबंध करणे आणि झोपडपट्टी भागांमध्ये स्वच्छता कायम राखली जावी, याकरिता प्रत्यक्ष कृतीतून जनमानसामध्ये संदेश देण्याकरिताही मोहिमेची मदत होत आहे. नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रत्येक विभागात पुरेसे मनुष्यबळ
आणि साधने उपलब्ध करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याकरिता घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांचेही सहकार्य मोहिमेला मिळत आहे. स्वच्छता मोहिमेच्या जोडीला पावसाळ्यातील आजारांच्या संशयित रुग्णांची तपासणी, जनजागृतीकरिता माहिती-शिक्षण-संवाद यांचाही अवलंब करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

आयुक्तांचे निर्देश
मालपांडोरी, अंबापाडा, जिजामाता नगर, साठे नगर, गायकवाड नगर, शिवाजी नगर, संजय नगर, लाल डोंगर, इंदिरा नगर, सिद्धार्थ वसाहत, खारदेव नगर, आनंद नगर, महात्मा फुले नगर, पंचशील नगर, रामकुंड नगर, धोबी घाट, सागर नगर, शिमला नगर, तुळशीवाडी, जनता नगर, पिंपळेश्वर वाडी, नर्गिस दत्त नगर, गझदरबंध परिसर, पेरी नगर व शास्त्री नगरमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.

कौला बंदर, घास बंदर, समुद्र गल्ली, ब्रीक बंदर, रेती बंदर, बालवाडी गल्ली, मीरा दातार मार्ग, संजय गांधी नगर, नवा नगर, नवी/ जुनी अंजीर वाडी, मोदी कम्पाउंड, एकता नगर, जरीवाला चाळ, बोट हार्ट मार्ग या भागातील स्वच्छतेकरिता स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत कार्यरत संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.

Web Title: Cleanliness of slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.