Join us

"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 11:00 AM

Sanjay Raut Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मशि‍दींवरील भोंगे हटवण्याची आणि मुंबईतील गुन्हेगारांची साफसफाई करण्याबद्दल भूमिका मांडली. त्यावरून संजय राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. 

Raj Thackeray Sanjay Raut: राज ठाकरे हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सत्तेबरोबरच आहेत, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. राज ठाकरेमुंबई कशी साफ करणार? असा सवालही राऊतांनी केला. बटेंगे तो कटेंगेवरून राऊतांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. 

मुंबईतसंजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सत्ता दिल्यास ४८ तासांत मशि‍दींवर भोंग उतरवू, अशी घोषणा राज ठाकरेंनी प्रचारसभेत केली.  त्यांच्या या विधानाबद्दल खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.

राज ठाकरे सत्तेबरोबरच -संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, "हा भोंगा आम्ही गेली २०-२५ वर्षे ऐकतो आहोत. त्यासाठी सत्तेची गरज नाही. अजिबात सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी-शाहांबरोबर आहात, म्हणजे सत्तेबरोबरच आहात. तुम्ही फडणवीसांबरोबरच आहात म्हणजे सत्तेबरोबरच आहात. तुमच्या हातात सत्ता येईल, ना येईल हा पुढला प्रश्न, पण एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असतो; त्यासाठी सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेली ५०-५० वर्षे कोणत्याही सत्तेशिवाय अनेकदा आपले अनेक कार्यक्रम राबवले आहेत", असे उत्तर संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिले. 

सत्ता आल्यास मुंबई २४ तासांत साफ करू, असेही राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या विधानावर प्रतिप्रश्न करत संजय राऊतांनी टोला लगावला. 

संजय राऊत म्हणाले, "म्हणजे कशी करणार साफ? कशी काय साफ करणार? बोलायला सोपं असतं. महाराष्ट्राची राजधानी आहे. सगळ्यात आधी मोदी-शाहांना साफ करा. तेच परप्रांतीय आहेत."

"सगळ्यात आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा. याच परप्रांतीयांनी मुंबई नासवली आहे आणि मुंबई आमच्या हातातून काढून घेण्याचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे. पण, दुर्दैवाने राज ठाकरे मोदी-शाह-अदाणींना मदत करत आहेत", असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला संजय राऊतांचं उत्तर

संजय राऊत म्हणाले, "त्यांनी पुढलं सांगायला पाहिजे. त्यांनी आमचा पक्ष वाटला. राष्ट्रवादी काँग्रेस वाटला. हीच वेळ त्यांची सत्ता गेल्यावर ते सुद्धा वाटले जातील. झुकतील आणि नष्ट होतील. त्या पक्षाचे भविष्य आहे."

"योगींच्या संदर्भात बटेंगे तो कटेंगे असे पोस्टर मुंबई लावले जात आहेत. याचं मला आश्चर्य वाटतं. योगी आदित्यनाथ यांना चार भाऊ आहेत. गेल्या ४० वर्षात चार भाऊ एकत्र आले नाहीत. अनेक वर्ष योगी आईला भेटू शकले नाहीत. आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेला गेले नाहीत आणि हे हिंदुत्ववादी आम्हाला कटेंगे बटेंगे शिकवतात. ज्या भाजपने आयुष्यभर बटेंगेचे राजकारण केले. त्यांना आता सत्तेसाठी ही घोषणा द्यावी लागतेय. आम्ही राष्ट्र, समाज एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करतोय आणि ते बटेंगे कटेंगेची भाषा करत आहेत", अशी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४संजय राऊतराज ठाकरेमुंबईनरेंद्र मोदी