लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांना बेस्ट बसगाड्यांच्या वेळापत्रकासह कोणत्या थांब्यावर बस किती वाजता पोहचेल? याची माहिती मोबाईलमध्ये एका क्लिकवर मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या चलो ॲप आणि स्मार्ट कार्डचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा वापर करुन भविष्यात रेल्वेसह मेट्रोमधूनही मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात बेस्ट ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना कमी दरात तिकीट खरेदीही करता येणार आहे.
कमी दरात तिकीट
बेस्टने प्रवाशासाठी ७२ प्रकारची तिकीट योजना जाहीर केली आहे. त्यामुळे तिकिटांचा किमान दर पाच रुपये असला तरी सुपर सेव्हरमुळे प्रत्येक फेरीमागे एक रुपये ९९ पैशांची बचत होणार आहे. हे तिकीट या ॲप्लिकेशनवरून काढता येणार आहे.
असे आहे मोबिलिटी कार्ड
- कॉमन मोबिलिटी कार्ड हे सर्व परिवहन सेवांसाठी वापरता येऊ शकते.
- हे तंत्रज्ञान स्वीकारलेल्या परिवहन सेवेत प्रवाशाला या कार्डचा वापर करून प्रवास करता येईल. मेट्रोच्या स्मार्टकार्डप्रमाणे या कार्डमध्ये पैसे जमा असतील. प्रवास केल्यानंतर ते पैसे वजा केले जातील.
- प्रवाशांना तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
प्रवास योजना (प्रति फेरी पाच रुपये)फेरी ५० १०० १५०कालावधी १४ दिवस २८ दिवस २८ दिवस दर १९९ २४९ २९९ प्रति फेरी सहा रुपये कालावधी १४ दिवस २८ दिवस २८ दिवस दर २४९ २९९ ३४९