क्लिक करा, शेअर करा! रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छ शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:27 AM2018-08-01T01:27:26+5:302018-08-01T01:27:50+5:30

रेल्वे स्थानकांवरील शौचालयांतील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘क्लिक करा, शेअर करा’ या नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे.

 Click, Share! Western Railway Program for Cleanliness of Clean Toilets at Railway Stations | क्लिक करा, शेअर करा! रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छ शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम

क्लिक करा, शेअर करा! रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छ शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम

Next

मुंबई : रेल्वे स्थानकांवरील शौचालयांतील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘क्लिक करा, शेअर करा’ या नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे. उपक्रमाअंतर्गत अस्वच्छ शौचालयांची छायाचित्रे ‘क्लिक’ करून ९००४४९९७३३ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर ‘शेअर’ करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात येत आहे.
‘स्वच्छ भारत, स्वच्छ रेल्वे’अंतर्गत रेल्वे स्थानकांवर स्वच्छता राखण्याचे आव्हान देशातील सर्व विभागीय रेल्वे प्रशासनासमोर रेल्वे बोर्डाने ठेवले आहे. यामुळे देशातील सर्व विभागीय रेल्वे स्थानके आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश नागरिक फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅप अशा समाजमाध्यमांचा वापर करतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे स्थानकांवरील अस्वच्छ शौचालये स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू केला आहे. चेतन कोठारी यांना पश्चिम रेल्वेने माहिती अधिकारातून दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार मार्गादरम्यान पुरुषांसाठी १२२ आणि महिलांसाठी ८८ शौचालये आहेत. मुताऱ्यांची संख्या पुरुषांसाठी ४३१,महिलांसाठी ४० आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी १६ शौचालये आहेत.

९००४४९९७३३ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाच्या माध्यमाने पश्चिम रेल्वेच्या जागेत अथवा रेल्वे स्थानकांवर ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावरील शौचालयांतील अस्वच्छतेबाबत फोटो काढून तक्रार नोंदविता येणार आहे. हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक २४ तास सुरू राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

स्वच्छ रेल्वे उपक्रमांतर्गत मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार कारशेडमध्ये दिवसा आणि चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भार्इंदर येथील यार्डात रात्रीच्या वेळी लोकलची स्वच्छता करण्यात येते. लोकलच्या स्वच्छतेसाठी २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर स्वयंचलित वॉशिंग प्लांट, उच्च क्षमतेचे पाण्याचे जेट, स्क्रबिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, क्लीनिंग सोल्युएशन, वायपर यांचा वापर करून प्रवाशांसाठी दैनंदिन धावणाºया लोकलचीदेखील स्वच्छता करण्यात येणार आहे.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Web Title:  Click, Share! Western Railway Program for Cleanliness of Clean Toilets at Railway Stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.