मुंबई : मुंबईतील वाहतूक बेट आणि महत्त्वाच्या नाक्यांवर नगरसेवकांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसवण्यात आले होते. या दिव्यांमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडली होती. मात्र या दिव्यांची नियमित देखभाल करण्यास पालिकेने कुचराई केल्याने सुमारे ९० टक्के दिवे बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात मुंबई दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघत असताना हायमास्ट दिवे बंद आहेत. बिल न भरल्यामुळे हे दिवे बंद असल्याची धक्कादायक कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे.महामार्ग आणि मोठ्या मैदानांवर प्रकाशासाठी हायमास्ट दिवे लावण्यात येतात. त्याप्रमाणे जुहू, वर्सोवा आणि सात बंगला येथील चौपाटी, वाहतूक बेट आणि महत्त्वाच्या नाक्यांवर हे दिवे बसवण्यात आले होते. या दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता अन्य साध्या दिव्यांपेक्षा अधिक आहे. मात्र हे दिवे सध्या बंद पडलेले आहेत. बºयाच वेळा हे दिवे सकाळीच चालू ठेवण्यात येतात आणि रात्री बंद असतात, अशी तक्रार स्थायी समिती सदस्यांनी केली आहे. शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी हा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणला.प्रशासन महापालिकेत केवळ हंगामी पदे भरण्यावर भर देत असल्याने दिव्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. ही बाब गंभीर असून प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी. तसेच ही सर्व पदे भरल्यानंतर नागरिकांना सुविधा मिळतील का? याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली. मुंबईतील हायमास्ट दिव्यांबाबतचा अहवाल समितीला सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले.प्रशासनाची कबुलीमहापालिकेकडून प्रत्येक प्रभागाला एमएनटीअंतर्गत दोन कोटी रुपये दिले जातात. या निधीतून प्रभागाने हायमास्ट दिव्यांचे बिल भरणे बंधनकारक आहे. मात्र, बिले न भरल्याने हायमास्ट दिवे बंद असल्याची कबुली अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली. हे दिवे कधी चालू होतील, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.देखभाल अयोग्य पद्धतीनेमुंबईत वाहतुकीची बेटे आणि महत्त्वाच्या नाक्यांवर नगरसेवक निधीतून हायमास्ट दिवे बसविण्यात आले. या दिव्यांची देखभाल महापालिकेकडून योग्य प्रकारे होत नसल्याने सुमारे ९० टक्के दिवे बंद अवस्थेत आहेत.अंधेरीतील समस्या जुनीच!अंधेरीत गेल्या पाच वर्षांपासून अनेक भागांतील दिवे बंद आहेत. प्रशासनाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर रिलायन्स कंपनीला काम दिल्याचे सांगून अधिकाºयांनी हात वर केले. तर हे काम आपल्याकडे नसल्याचे रिलायन्सकडून सांगितले जात आहे. अंधेरीत दिवे सुरू नसल्याने नागरिक अंधारातून प्रवास करीत आहेत, अशी तक्रार शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी केली.
ऐन दिवाळीत हायमास्ट दिवे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 7:13 AM