मुंबईराज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप रेणू शर्मा यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता तक्रारदार महिलेच्या वकीलांनी आणखी एक आरोप करत वादाला तोंड फोडलं आहे.
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील अॅड. रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची दुसऱ्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचंही त्रिपाठी म्हणाले आहेत.
धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करणारी महिला डी.एन.नगर पोलीस ठाण्यात; सोमय्या देखील धावले मदतीला
दरम्यान, तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी आज सकाळी डीएन नगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. रेणू शर्मा यांचा जबाब यावेळी नोंदविण्यात येत आहे. पावणे बाराच्या सुमारास तक्रारदार महिलेने एसीपी कार्यालयात धाव घेतली. त्यानुसार जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यात मुंडे यांचा देखील जबाब नोंदविण्यात येणार असल्याचेही पोलिसांकड़ून सांगण्यात आले. जबाब अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तक्रारदार महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी दिली आहे. ओशिवरा पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे एसीपी मार्फ़त जबाब नोंदविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांनी सोडले मौन, राष्ट्रवादीचा भूमिका केली स्पष्ट