लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर जाऊन दीड तास बंदद्वार चर्चा केली. बैठकीचा तपशील कळू शकला नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यंतरी मुंबईत दिवसभराच्या भेटीसाठी आले असता अजित पवार पुण्यात विविध कार्यक्रमांना हजर राहिले होते. अपरिहार्य कारणांमुळे आपण मुंबईत राहू शकलो नाही पण त्याची पूर्वकल्पना आपण शाह यांच्या कार्यालयास दिली होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यातच, अर्थ खाते आपल्याकडे राहील की नाही, सांगता येत नाही असे विधान पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस-अजित पवार यांच्यातील आजची दीड तासांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.