मुंबई : मालाड रेल्वे स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पूल व मध्यवर्ती पुलाला जोडणारा पूर्व दिशेकडील स्कायवॉक दुरुस्तीसाठी १० डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे.या भागात नवीन गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे याचा वापर बंद ठेवण्यात येईल. २२ डिसेंबरपासून हा भाग पुन्हा वापरण्यास प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. या कालावधीतप्रवासी मालाड स्थानकातील उत्तर दिशेकडील भागाचा वापर करू शकतील.
मालाड स्कायवॉक दुरुस्तीसाठी १० ते २१ डिसेंबरदरम्यान बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:53 AM