बंद असलेली ‘माथेरानची राणी’ नाताळपूर्वी होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:53 AM2019-11-16T05:53:11+5:302019-11-16T05:53:18+5:30
माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेनची सेवा सुरू होणार आहे.
मुंबई : माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेनची सेवा सुरू होणार आहे. मिनी ट्रेनचा मार्ग २५ डिसेंबरपूर्वी खुला करण्यात येणार आहे. अमन लॉज ते माथेरानपर्यंतच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. तर नेरळ ते माथेरान या २२ किमी मार्गाची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. हे काम पुढील ४ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्टे असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नेरळ, माथेरान भागात जोरदार पाऊस पडल्याने रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले. या मार्गातील खडी, रेती वाहून गेली. परिणामी, नेरळ ते माथेरान २२ किमीच्या रेल्वे मार्गात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मिनी ट्रेनच्या फेºया बंद केल्या होत्या. त्यामुळे माथेरान येथे येणाºया पर्यटकांचा मिनी ट्रेनची सेवा नसल्याने हिरमोड झाला. मात्र, आता या मार्गाचे काम सुरू झाल्याने पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करू शकतात, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.
रेल्वेकडून नेरळ ते माथेरान २२ किमीच्या मार्गाची दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. माथेरान येथील एका मार्गिकेचे काम १५ दिवसांपूर्वीच सुरू केले आहे. हे काम पुढील २० ते २५ दिवसांत
पूर्ण होईल. त्यानंतर, अमन
लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू केली जाईल.
नेरळ ते माथेरान २२ किमीच्या मार्गासाठी ६ कोटींचा खर्च येणार आहे.
६० कामगारांद्वारे या मार्गाचे काम केले जात आहे.
नेरळ ते माथेरान ६ फेºया चालविण्यात येतात.
एका महिन्याला ९० हजार प्रवाशांचा प्रवास