लॉकडाऊनमध्ये बंद टेलिफोन बूथ होणार सुरू; मुंबई महापालिकेचे परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:25 AM2020-10-11T00:25:51+5:302020-10-11T00:26:02+5:30
Coronavirus, BMC News:दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात बैठक पार पडली.
मुंबई : लॉकडाऊन काळात बंद असलेले टेलिफोन बुथ सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. दिव्यांगा रेल्वे प्रवासाची परवानगी यापूर्वीच मिळाली आहे. तसेच पालिकेकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्याही लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात बैठक पार पडली.
पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणाºया निधीचा विनियोग पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करून दिव्यांगांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांना अर्थसंकल्पात आरक्षित निधीतून मासिक निवृत्ती वेतन योजना सुरू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आहेत मागण्या...
- लॉकडाऊनमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेने आर्थिक साहाय्य करावे.
- टेलिफोन बूथधारकांच्या परवान्यावरून हॉकर्स हा शब्द काढून टाकावा.
- टेलिफोन बूथवर सर्व प्रकारच्या वस्तू विकण्याची परवानगी द्यावी.
- दिव्यांगांचे प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी पालिकेने ‘दिव्यांग कल्याण विभागा’ची स्थापना करावी.
- पालिकेकडून होणाºया स्कूटर वाटपात सुसूत्रता आणावी. प्रकिया वेगाने करावी.