प्रशासनाविरोधात फेरीवाल्यांचा बंद

By Admin | Published: January 21, 2015 01:10 AM2015-01-21T01:10:27+5:302015-01-21T01:10:27+5:30

केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी करत आझाद हॉकर्स युनियनच्या नेतृत्वाखाली मुंबईतील फेरीवाल्यांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला.

The closure of the hawkers against the administration | प्रशासनाविरोधात फेरीवाल्यांचा बंद

प्रशासनाविरोधात फेरीवाल्यांचा बंद

googlenewsNext

मुंबई : केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी करत आझाद हॉकर्स युनियनच्या नेतृत्वाखाली मुंबईतील फेरीवाल्यांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. या वेळी संपूर्ण दिवस फेरीचा धंदा बंद करून फेरीवाल्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शिवाय सर्वेक्षणात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:ची नोंदणी फेरीवाला म्हणून केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेने फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
संघटनेने केलेल्या आंदोलनादरम्यान ज्या फेरीवाल्यांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घेण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The closure of the hawkers against the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.