कपडे व्यापाऱ्यांची २२ लाखांना फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:05 AM2021-04-03T04:05:42+5:302021-04-03T04:05:42+5:30

मुंबई : कपड्यांचा व्यवहार करत दोघांनी दोन कपडे व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार काळबादेवीमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी नुकताच गुन्हा ...

Clothing traders cheated Rs 22 lakh | कपडे व्यापाऱ्यांची २२ लाखांना फसवणूक

कपडे व्यापाऱ्यांची २२ लाखांना फसवणूक

Next

मुंबई : कपड्यांचा व्यवहार करत दोघांनी दोन कपडे व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार काळबादेवीमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. यात २२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

....................................

किरकाेळ भांडणातून तलवारीने हल्ला

मुंबई : किरकोळ भांडणातून तलवारीने हल्ला चढविल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर परिसरात घडला. २९ मार्च रोजी ही घटना घडली. यात अब्दुल करीम अब्दुल रहीम शेख (वय २९) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

....................................

वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नका!

मुंबई : नागरिकांची ऑनलाइन फसवणूक हाेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर बँकेचे व्यवहार करू नका, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. ती सर्वाजनिक करू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केले आहे.

.......................................

मास्कबाबत पाेलिसांकडून ट्विटरद्वारे जनजागृती

मुंबई : मुंबईकरांनी मास्कचा वापर करावा यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मार्गदर्शन, जनजागृती प्रसंगी कारवाई करण्यात येत आहे. आता ट्विटर अकाउंटवरूनही पाेलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. ‘मास्क इज द सिक्रेट ऑफ अवर सेफ्टी’, ‘कुठल्याही ब्रँडचा वापरा, पण मास्क नक्की वापरा, कारण प्रत्येक जबाबदार नागरिकाला बघून आम्ही हेच म्हणतो वाह, मास्क!’ असे ट्विट त्यांनी केले. या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा आहे.

..................................

Web Title: Clothing traders cheated Rs 22 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.