Join us

पूर्वेचे ढग पाऊस घेवून येणार!

By admin | Published: July 10, 2015 9:26 PM

पूर्वेचे ढग पाऊस घेवून येणार!

पूर्वेचे ढग पाऊस घेवून येणार!
पाच दिवस पावसाचा अंदाज
मुंबई: पूर्वेकडून पाऊस घेवून येणारे ढग देशाच्या पश्चिम भागाला पुढील पाच दिवस पावसाचा दिलासा देतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. पूर्वेकडील वातावरणामुळे कोकण-गोव्यात ७६-१०० टक्के, मध्य महाराष्ट्रात १-२५ टक्के, मराठवाड्यात १-२५ टक्के आणि विदर्भात २६-५० टक्के पाऊस पडेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी कमाल तापमानासह आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, मुंबईकर कमालीचे हैराण झाले आहेत. गुरुवारसह बुधवारी शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसाचे प्रमाण तुरळक आहे. पुढील ४८ तासांत शहरात पावसाच्या काही सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचा उत्तर भाग व लगतच्या बिहार आणि झारखंडवर असलेल्या कमी दाब क्षेत्राचे न्यून दाब क्षेत्रात रुपांतर झाले आहे. शिवाय समुद्रसपाटीवर कर्नाटक ते केरळ किनारप˜ीलगत कमी दाबाचा प˜ा तयार झाला आहे. यामुळे पुढील २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
...........................
११-१२ जुलै : कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता
१३-१४ जुलै : दक्षिण कोकण-गोवा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
...........................