Join us

मुंबईवर ढगांचे सावट, हवेचा दर्जा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:49 AM

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात अंशत: वाढ झालेली असतानाच हवेची गुणवत्ता ढासळल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण होते.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात अंशत: वाढ झालेली असतानाच हवेची गुणवत्ता ढासळल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण होते. तसेच कुलाबा, माझगाव आणि घाटकोपर परिसरात धुरके पसरले होते. बोरीवली, चेंबूर, मानखुर्द परिसरात धुरक्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. गुरुवारीही शहरासह उपनगरात असेच ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.मुंबई वेधशाळेच्या दैनंदिन हवामान वृत्तानुसार सध्या महाराष्टÑावर ढग पसरले आहेत. बुधवारी सायंकाळनंतर ढगांचा पट्टा पूर्वेकडे सरकू लागला आहे. शुक्रवारपर्यंत ढग पूर्वेकडे सरकतील. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल.२०० मिलिबार दाब असलेल्या अति दाबाच्या हवेच्या पट्ट्यामध्ये (हाय क्लाउड) आणि जमिनीलगतच्या कमी दाबाच्या हवेच्या पट्ट्यामधील संपर्कामुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये फरक पडला आहे. गेल्या चार-पाच दिवसांत मुंबईचे किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअस होते. परंतु मंगळवारी किमान तापमान १९च्या पुढे आणि बुधवारी २०च्या पुढे गेले. त्यामुळे अचानक तापमानात झालेल्या बदलामुळेदेखील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. तसेच राज्याच्या काही भागांत पावसाचा शिडकावा झाला आहे. गुरुवारीदेखील पाऊस पडू शकतो. शुक्रवारनंतर आकाश निरभ्र होईल.पाऊस पडेलहवेचा अतिउच्च दाबाचा पट्टा, मंद सूर्यप्रकाश, वाºयाचा अभाव या कारणांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता घसलेली आहे. हवेचा अतिउच्च दाबाचा पट्टा गुरुवारपासून पूर्वेकडे सरकू लागला आहे. शहरासह राज्यात ढगाळ वातावरण असले तरी, पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. तरीही काही ठिकाणी पाऊस पडेल. दोन दिवसांत शहरासह उपनगरांमधील ढगाळ वातावरण नाहीसे होऊन हवेची गुणवत्तादेखील सुधारेल, असे मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.>अशी होती हवेची गुणवत्ताठिकाण हवेची दर्जागुणवत्ताबीकेसी ३२७ अतिशय वाईटवरळी १७१ बरीमाझगाव ३३९ अतिशय वाईटचेंबूर ११३ बरीभांडुप ३२७ अतिशय वाईटबोरीवली ३६३ सर्वांत वाईटकुलाबा ३२० अतिशय वाईटमालाड २६५ वाईटनवी मुंबई ३०८ अतिशय वाईटअंधेरी २६० वाईट>मुंबईतील हवामानाची स्थिती बिघडलेली आहे. ही परिस्थिती तात्पुरती आहे. हवेतील आर्द्रता आणि हवेचा वाढलेला दाब यामुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे. शुक्रवारी हवेचा दर्जा सुधारेल.- गुफ्रान बेग, प्रकल्प संचालक, सफर>विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीची शक्यताविदर्भ, मराठवाड्यातील बहुतांशी भागात १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीटीची शक्यता आहे. शेतकºयांनी पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ११ ते १३ फेब्रुवारी रोजी गारपीट होईल. १४ फेब्रुवारीपासून हवामान सर्वसाधारण होईल.