Join us

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत ढगाळ वातावरण; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 4:11 AM

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई :  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अद्यापही मुंबईवर असून, सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीदेखील मुंबईमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली. तसेच शुक्रवारी झालेला पाऊस आणि हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात कमालीची घट झाली असून सोमवारनंतरच मुंबईकरांना मोकळ्या आकाशासह सूर्यनारायणाचे दर्शन घडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमधील हवामान रविवारीदेखील ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येतील. गेले तीन दिवस हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी खाली घसरले. आता मात्र यात वाढ हाेण्याची शक्यता आहे.रात्रीच्या वेळी पावसाचा शिडकावामुंबई शहर, उपनगरात काही ठिकाणी शनिवारी रात्री उशिरा पावसाच्या तुरळक सरींचा शिडकावा झाला.