मुंबईत ढगाळ वातावरण, तापमानात घट
By admin | Published: December 12, 2015 02:26 AM2015-12-12T02:26:36+5:302015-12-12T02:26:36+5:30
नैर्ऋत्य अरबी समुद्र आणि लगतच्या भागावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून शुक्रवारी मुंबई आणि उपनगरांतील आकाश ढगाळ झाले होते.
Next
मुंबई : नैर्ऋत्य अरबी समुद्र आणि लगतच्या भागावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून शुक्रवारी मुंबई आणि उपनगरांतील आकाश ढगाळ झाले होते. पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि परिसरातील आकाश ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २० अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामानातील बदलामुळे गारव्याचे प्रमाण वाढले आहे.