Join us

मिहान येथे होणार संरक्षण साहित्य निर्मिती क्लस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 4:51 AM

संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये २० एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

मुंबई : संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये २० एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे ५० हजार रोजगार उपलब्ध होईल. सह्याद्री येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर १० मधील सुमारे २० एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. सामाजिक भावनेतून या ठिकाणी विविध संरक्षण साहित्य निर्मिती केली जाणार आहे.शिर्डी विमानतळ येथे नाइट लँडिंगची सुविधा तातडीने सुरू होईल यादृष्टीने कामास गती देण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्र्यांनी पुरंदर, बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिक विमानसेवा जोडणी योजनेतील कामांचादेखील या वेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद असल्याचेदेखील या वेळी सांगण्यात आले.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नगर नियोजन विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी २१ पदे तातडीने भरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.हरित क्षेत्र असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभानंतर आतापर्यंत सुमारे ५० हजार प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या २ हजार विमानांच्या फेºया झाल्या आहेत. या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या रेखांकनासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याच्या मागणीस या वेळी मान्यता देण्यात आली आहे.साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता तसेच एकंदरीतच शिर्डी येथे विमानसेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीचे लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार असून सध्याची २ हजार ५०० मीटर लांबीची धावपट्टी ३ हजार २०० मीटर करण्यात येणार आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस