हॉल तिकिटावरील चुकांमुळे गोंधळ
By Admin | Published: February 9, 2017 02:45 AM2017-02-09T02:45:55+5:302017-02-09T02:45:55+5:30
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असतानाही गोंधळ कमी झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर विषय चुकवल्याने काही ठिकाणी गोंधळ उडाला
मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असतानाही गोंधळ कमी झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर विषय चुकवल्याने काही ठिकाणी गोंधळ उडाला. तथापि, महाविद्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसारच हॉलतिकीट छापल्याचे बोर्डातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
२८ फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे, तर बुधवार, ८ फेब्रुवारीपासून तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी हॉल तिकिटांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये विषय चुकले असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका असल्यास, बोर्डाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)