ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 02:02 AM2017-08-23T02:02:31+5:302017-08-23T02:02:39+5:30

युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध ९ संघटनांचे १० लाख बँक कर्मचारी मंगळवारी संपात उतरल्याचा दावा फोरमने केला आहे.

Cluttering at the mouth of Ann Ganeshotsav | ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली

Next

मुंबई : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध ९ संघटनांचे १० लाख बँक कर्मचारी मंगळवारी संपात उतरल्याचा दावा फोरमने केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली असली, तरी एटीएममुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र मुंबईत दिसले. दरम्यान, धनादेश वटणावळमधील सर्व कर्मचारी संपात उतरल्याने आजचे व्यवहार उद्यावर ढकलले गेले आहेत.
फोरमचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, राज्यातील २२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह ४ जुन्या खासगी बँका, २ प्रादेशिक ग्रामीण बँका यांमधील १० हजार शाखा संपामुळे बंद होत्या. त्यामुळे बँकांचे दरवाजेच उघडले नसल्याने त्यामधील ४० हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकारी संपात सामील झाले. विविध बँकांचे एटीएम सकाळी काही प्रमाणात सुरू होते. मात्र काही तासांतच रोखीचे व्यवहारही ठप्प पडले. सरकारचे व्यवहार होत असलेल्या स्टेट बँकेतील कर्मचा-यांनी १०० टक्के व्यवहार बंद ठेवल्याने सरकारचे कामही बंद पडल्याचा दावा तुळजापूरकर यांनी केला आहे.
संपामध्ये उतरलेले शेकडो बँक कर्मचारी व अधिकारी सकाळी आझाद मैदानात जमले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात आंदोलकांनी निदर्शने केली. सरकारने बड्या उद्योगपतींकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी उपाययोजना राबवण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

१५ सप्टेंबरला लोकसभेवर महामोर्चा
यापुढेही सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण किंवा एकत्रीकरण केल्यास १५ सप्टेंबरला लोकसभेवर देशव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा फोरमने दिला आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आॅक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवसांचा संप करण्यात येणार आहे, असे फोरमने स्पष्ट केले.

गणेशभक्तांकडून नाराजी
बँकांनी पुकारलेल्या संपाची कल्पना नसलेल्या ग्राहकांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. योगेश शिंदे म्हणाले की, अवघ्या तीन दिवसांवर गणपतीचे आगमन होणार असून, तयारीसाठी पैशांची आवश्यकता आहे. गणेशोत्सवासाठी गोव्याहून मुंबईत आलो. आज बँकेतून पैसे काढून खरेदी केल्यावर आजच्याच गाडीने जायचे होते. संपामुळे आजची सुट्टी वाया गेली असून, उद्या बँक उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Cluttering at the mouth of Ann Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.