विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम्ही एकत्र लढलो तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल आणि वेगळे लढलो तर विरोधकांना त्याचा फायदा होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा युतीसाठी हाक दिली आहे.एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी निवडणुकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना भाजपाची युती व्हायला हवी. युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत, आम्ही भाऊ आहोत त्यात मोठा कोण आणि लहान कोण हे माध्यमांनी ठरवावे मात्र आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड आदर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो तरी बाळासाहेबांवर टीका करणार नाही हे मोदींनी पहिल्या सभेतच जाहीर केले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली